मुंबई, 11 जानेवारी : ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्या दरम्यान भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने नुकतीच 18 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचे स्टार गोलंदाज हे दुखापत ग्रस्त असल्यामुळे ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियासाठी तितकीशी सोपी असणार नाही. तेव्हा दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलिया संघासोबत खेळात कसोटी मालिकेत भारतीय संघाला फायदा होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कांगारू संघात चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. ऑफस्पिनर टॉड मर्फीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कमाल केली आहे. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्याला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघावर नजर टाकली तर टॉड मर्फी, अॅश्टन अगर, मिचेल स्वेपसन आणि नॅथन लायन यांचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे स्टार गोलंदाज ग्रीन आणि स्टार्कला दुखापत झाली होती. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या बोटात फ्रॅक्चर झाले होते. ऑस्ट्रेलिया संघातील स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांना दुखापतीमुळे भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी महिन्यात कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारीला अरूण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होईल. तिसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्च दरम्यान हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर होणार असून चौथा कसोटी सामना हा 9 ते 13 मार्च दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ :
पॅट कमिन्स, अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर
An 18-player Test squad has been assembled for the Qantas Tour of India in February and March.
Congratulations to everyone selected! pic.twitter.com/3fmCci4d9b — Cricket Australia (@CricketAus) January 11, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Test series