मुंबई, 3 मार्च : आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदोर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारतावर 9 विकेट्सने विजय मिळवला असून कसोटी मालिका 2-1 अशी पिछाडी कमी केली आहे. अशातच भारताविरुद्धच्या कसोटी सामना जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने आता थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला इंदोर येथील सामना जिंकणं महत्वाचं होत. भारताने पहिल्या दोन सामन्यात आघाडी मिळून देखील ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्यात भारतीय संघावर भारी पडलं. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये 68. 52 टक्क्यांसह सर्वोच्च मिळवलं आहे. त्यामुळे ते थेट फायनल सामन्यात पोहोचले. विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटरने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा आजचा कसोटी सामना गमावलेला भारतीय संघ 60. 29 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर असून श्रीलंका 53. 33 टक्के तर दक्षिण आफ्रिका 52. 38 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे. आजचा सामना जर भारताने जिंकला असता तर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला असता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला काहीही करून अहमदाबाद येथे होणार चौथा कसोटी सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिकाजर 2-2 अशा बरोबरीत सुटली तर भारताला न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.