मुंबई, 3 मार्च : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याला काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून खुलेआम प्रपोज करणारी इंग्लडची महिला क्रिकेटर डॅनिएल व्याटने तिची गर्लफ्रेंड जॉर्जी हॉजला हिच्याशी साखरपुडा केला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. तर भारताच्या काही महिला क्रिकेटरनी देखील तिला साखरपुडयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. इंग्लंडची स्टार महिला क्रिकेटर डॅनिएल व्याट आणि फुटबॉल एजंट जॉर्जी हॉज यादोघीजणी अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघीही लंडनयेथे राहत असून अनेकदा एकमेकांसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतात. डॅनिएल व्याटने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या गर्लफ्रेंडला किस करताना दिसतेय. तसेच तिने तिच्या बोटात डायमंड रिंग देखील घातली आहे. तसेच या फोटोला तिने ‘Mine forever’ असे कॅप्शन दिले. तिच्या या पोस्टला भारताच्या महिला क्रिकेटर हरलीन देओल आणि मोना मेश्राम यांनी लाईक आणि कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
डॅनिएल व्याट ही विराट कोहलीसोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची देखील मैत्रीण आहे. विराटनंतर अर्जुन सोबत देखील काही फोटो व्हायरल झाल्याने तिझे नाव अर्जुन सोबत देखील जोडले गेले होते. 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात डॅनिएल व्याटने स्वतःची बेस प्राईज 50 लाख ठेवली होती. परंतु तिला आपल्या संघात घेण्यात कोणत्याही फ्रेंचायझीने स्वारस्य दाखवलं नाही.