मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

‘मी शेन वॉर्नला डेट करत होते’, ऑस्ट्रेलियातील ओन्ली फॅन्स स्टार 'गिना'चा सिक्रेट रिलेशनशिपबद्दल खुलासा

‘मी शेन वॉर्नला डेट करत होते’, ऑस्ट्रेलियातील ओन्ली फॅन्स स्टार 'गिना'चा सिक्रेट रिलेशनशिपबद्दल खुलासा

‘मी शेन वॉर्नला डेट करत होते’, ऑस्ट्रेलियातील ओन्ली फॅन्स स्टार गिनाचा सिक्रेट रिलेशनशिपबद्दल खुलासा

‘मी शेन वॉर्नला डेट करत होते’, ऑस्ट्रेलियातील ओन्ली फॅन्स स्टार गिनाचा सिक्रेट रिलेशनशिपबद्दल खुलासा

Shane Warne Relationship : सोशल मीडिया हँडलवर स्वतःचं 'जगातील सर्वात हॉट दादी' म्हणून वर्णन करणाऱ्या गिनाने ती ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर दिवंगत शेन वॉर्नसोबत सिक्रेट रिलेशनशिपमध्ये होती, असा दावा केलाय.

  मुंबई, 17 ऑगस्ट: ऑस्ट्रेलियाची ओन्ली फॅन्स स्टार गिना स्टुअर्टच्या (Australia OnlyFans star Gina Stewart) एका दाव्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया हँडलवर स्वतःचं 'जगातील सर्वात हॉट दादी' म्हणून वर्णन करणाऱ्या गिनाने ती ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर दिवंगत शेन वॉर्नसोबत (Shane Warne) सिक्रेट रिलेशनशिपमध्ये होती, असा दावा केलाय. ‘या वर्षी मार्चमध्ये थायलंडमध्ये वॉर्नचा मृत्यू झाला. या पूर्वी मी त्याच्या नियमित संपर्कात होते. तो माझा खूप जवळचा आणि विश्वासू मित्र होता. त्याच्या जाण्याने मी उद्ध्वस्त झाले आहे,’ असंही गिनाने ट्विटमध्ये म्हटलंय.
  “गेल्या काही महिन्यांपासून मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. जगाने एक लिजेंड खेळाडू गमवला आणि मी एक विश्वासू मित्र गमवला. सगळंच अकल्पनीय घडलं. मी शेनला डेट करत होते, पण याबाबत कोणालाच माहीत नव्हतं. त्याला ते खासगी ठेवायचं होतं,” असं तिने डेली स्टारशी बोलताना सांगितलं.
  ती म्हणाली, “तो गोल्ड कोस्टला आला आणि क्रिकेट मॅचनंतर मी त्याला भेटले. आम्ही याबद्दल कुणालाही कळू दिलं नाही. ती रात्र आम्ही एकमेकांना जाणून घेण्यात घालवली. मला तो खूप इंटरेस्टिंग वाटला आणि मला त्याच्या आयुष्याबद्दल ऐकून घ्यायला आवडलं. तेव्हापासून आम्ही खूप जवळ होतो आणि मी आमच्या नात्याबद्दल कुणालाही कळणार नाही, याबद्दल त्याला वचन दिलं होतं.”
  मीडियाच्या नजरा टाळण्यासाठी ती आणि वॉर्न काय करायचे, याबद्दलही गिनाने सांगितलं. "मी जिथे राहत होते तिथे माझे फोटो काढण्याचा प्रयत्न करत असलेलं एक पब्लिकेशन होतं. त्यामुळे त्या वेळी मला पापाराझींबद्दल (paparazzi) सावध राहावं लागलं. शेन आणि मी बाहेर जाण्यासाठी टोपी आणि सनग्लासेस घालायचो. आम्ही गोल्ड कोस्ट आणि नंतर मेलबर्नलाही (Melbourne) गेलो होतो." त्यांच्या कथित प्रेमसंबंधाच्या खासगी स्वरूपाचा संदर्भ देत गिना पुढे म्हणाली, “शेन मीडियावर थोडा नाराज असायचा आणि त्याला आमच्याबद्दल बाहेर कळू द्यायचं नव्हतं. परिणामी, मलाही सगळ्या ऑफर नाकाराव्या लागल्या आणि सर्व काही सिक्रेट ठेवावं लागलं.”
  “मी पहिल्यांदाच याबद्दल जाहीरपणे बोलत आहे आणि मी नेहमीच त्याच्या इच्छेप्रमाणे वागत माझं आयुष्य खासगी ठेवलं. मी आत्तापर्यंत बोलू शकले नाही, परंतु, तो खूपच काळजी घेणारा माणूस होता, हे लोकांना कळावं अशी माझी इच्छा आहे. त्याने चांगली कामं केली. तो खरंच एक लिजेंड होता आणि त्याच्या मुलांना कायम त्याचा अभिमान वाटेल इतका तो चांगला होता.”
  वॉर्न थायलंडला जाण्यापूर्वी तिचं त्याच्याशी बोलणं झाल्याचाही तिने खुलासा केला. "तो थायलंडला जाण्यापूर्वी मी त्याच्या संपर्कात होते. तो एक चांगला श्रोता होता. तुम्ही त्याच्यासाठी महत्वाचे आहात, अशी जाणीव तो करून द्यायचा. मी तुला खूप आधीपासून ओळखत असल्यासारखं कंफर्टेबल तुझ्यासोबत वाटतं, असं तो मला म्हणायचा."
  दरम्यान, थायलंडच्या कोह सामुई बेटावर 4 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने शेन वॉर्नचं निधन झालं. त्याने 145 कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलं होतं. रिकी पाँटिंग आणि अॅलन बॉर्डर यांच्यानंतर बॅगी ग्रीन जिंकणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू होता. त्याने करिअरमध्ये 194 वन-डे खेळल्या आणि 1001 विकेट्स घेतल्या. कसोटीत, 708 विकेट्ससह तो श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विकेट घेणारा बॉलर आहे.
  First published:

  Tags: Relationship, Shane Warne

  पुढील बातम्या