लीड्स, 27 जून : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. (Eng Vs NZ) इंग्लंडने ही मालिका एकतर्फी 3-0 अशी जिंकली. इंग्लंड संघाने या मालिकेत आक्रमक स्वरुपात खेळ केला आणि किवींच्या संघावर मात केली. (England Beat NZ) मालिकेत जॉनी बेअरस्टोची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. तर याच सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र, याचदरम्यान आणखी एक बातमी समोर आली आहे. सामन्यादरम्यान, लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर काही प्रेक्षक एकमेकांविरोधात भिडले (Fight Between Audience) आणि त्यांनी जोरदार हाणामारी केल्याची घटना घडली. शेवटी पोलिसांना याप्रकरणी मध्यस्थी करावी लागली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रेक्षक एकमेकांमध्ये भिडल्याचे दिसत आहे. तर तेच दुसरीकडे काही दर्शक त्यांच्यावर हसताना दिसत आहेत.
Gazza getting rowdy at headingley pic.twitter.com/ClxT7zkTRn
— Alex Buxton (@buxton_13) June 26, 2022
दरम्यान, तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत मालिका 3-0 अशी खिशात घातली. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा 7 विकेट्सने पराभव केला. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या बेअरस्टोने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. पहिल्या डावात बेअरस्टोने 157 चेंडूत 162 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 161 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 44 चेंडूत 71 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. हेही वाचा - इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या इयन मॉर्गनचा राजीनामा भारतीय संघाला झटका - इंग्लंड संघ आता भारतीय संघाविरुद्ध बर्मिंगहॅम येथे 1 जुलै रोजी कसोटी खेळणार आहे. दरम्यान, कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. रोहितला डॉक्टरांच्या देखरेखीखाली विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या टेस्ट सामन्या रोहित शर्मा खेळणार की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही. त्याचा अहवाल 30 जूनला येणार आहे. त्यानंतरच रोहित शर्मा खेळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.