जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द, कोरोना आणि व्यग्र वेळापत्रकामुळे निर्णय

टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द, कोरोना आणि व्यग्र वेळापत्रकामुळे निर्णय

टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द, कोरोना आणि व्यग्र वेळापत्रकामुळे निर्णय

कोरोना व्हायरस (Corona Virus) आणि खेळाडूंच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आणखी एक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आशिया कप (Asia Cup) 2021 ही स्पर्धा पुढच्या दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 23 मे : कोरोना व्हायरस (Corona Virus) आणि खेळाडूंच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आणखी एक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आशिया कप (Asia Cup) 2021 ही स्पर्धा पुढच्या दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आली आहे. आता या स्पर्धेचं आयोजन 2023 साली होणार आहे. यावर्षी आशिया कपचं आयोजन पाकिस्तानऐवजी श्रीलंकेमध्ये होणार होतं, पण तिकडेही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आशिया कप रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आशिया खंडातल्या चार मोठ्या टीमना यावर्षाच्या शेवटपर्यंत वेळ नाही, त्यामुळे स्पर्धेचं आयोजन करणं मुश्कील झालं होतं. बोर्डाने परिस्थिती लक्षात घेता स्पर्धा रद्द करण्याचं ठरवलं, असं आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) सांगितलं. ‘आशिया कपचं आयोजन यंदा न करता 2023 साली करणंच व्यावहारिक होतं, कारण 2022 साली आधीच आशिया कपचं आयोजन निश्चित झालं आहे. वेळेनुसार त्याच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल,’ असं वक्तव्य परिषदेने दिलं. यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमुळे आशिया कपचं आयोजनही टी-20 फॉरमॅटमध्ये होणार होतं. 2018 पासून आशिया कप खेळवण्यात आलेला नाही. 2020 सालीही स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली. भारताने मागच्या दोन्ही वेळा आशिया कप जिंकला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात