दिल्ली, 17 जून : टीम इंडियाला WTC च्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचूनही कप मिळवता आला नाही. आता टीम इंडियाचं लक्ष्य आशिया कपकडे आहे. आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड होणं अजून बाकी आहे. टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी क्रिकेटपटू रात्रंदिवस मेहनत करत असल्याचे त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले. या खेळाडूला आशिया कपमध्ये जागा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आशिया कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यंदा आशिया चषक एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाईल. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा एक खेळाडू मैदानात परतण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या खेळाडूला आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. भारत-पाक अहमदाबादमध्ये लढणार? PCB प्रमुखांनी झटकले हात, सरकारच्या कोर्टात चेंडू आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचे कर्णधार असलेला केएल राहुल सामना खेळताना जखमी झाला होता. त्यामुळे त्याला WTC च्या फायनल सामन्यात तो खेळू शकला नाही. त्याला मांडीवर शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या के एल राहुल फिजिओथेअरपी घेत आहे. केएल राहुल मैदानात परतण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. आशिया कपमध्ये के एल राहुलला संधी दिली तर तो मॅचविनर ठरु शकतो. त्यामुळे त्याला आता फिटनेस टेस्ट देऊन ती क्लिअर करावी लागणार आहे. जर ही टेस्ट तो क्लिअर करु शकला तर त्याला टीम इंडियात संधी मिळू शकते. चाहते देखील प्रार्थना करत आहेत. केएल राहुलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1986 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतकांचा समावेश आहे. त्याने 47 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये केएल राहुलने 33.44 च्या सरासरीने 2642 धावा केल्या आहेत. यादरम्यान केएल राहुलच्या बॅटमधून १३ अर्धशतके आणि ७ शतके झळकली आहेत. राहुलची टी-20मधील आकडेवारीही प्रभावी आहे. त्याने 72 टी-20 सामने खेळताना 2265 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







