जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारत-पाक अहमदाबादमध्ये लढणार? PCB प्रमुखांनी झटकले हात, सरकारच्या कोर्टात चेंडू

भारत-पाक अहमदाबादमध्ये लढणार? PCB प्रमुखांनी झटकले हात, सरकारच्या कोर्टात चेंडू

भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ सहभागी होण्याबाबत शंका व्यक्त केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

इस्लामाबाद, 17 जून : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपचे आयोजन यंदा भारतात होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तान सहभागी होणार की नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. भारताने आशिया कपसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. आता पाकिस्तानकडून धमकी दिली जात आहे की वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा या प्रश्नाचा चेंडू सरकारच्या कोर्टात टोलावला. पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ सहभागी होण्याबाबत शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, सरकारच्या मंजुरीवर सगळं अवलंबून आहे. सेठी यांच्या या भूमिकेमुळे आयसीसीला वर्ल्ड कपचं शेड्युल ठरवणं कठीण जाणार आहे. Ashes 2023 : नशीबच खराब; विकेटकिपर झेल घ्यायला धडपडत होता, पण ब्रूक बोल्ड झाला   नजम सेठी यांचे वक्तव्य आश्चर्यजनक आहे कारण आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांच्यासह सर्वांनी पीसीबी प्रमुखांनी दिलेल्या आशिया कपच्या हायब्रिड मॉडेलच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सेठी यांनी म्हटलं की, भारत आणि पाकिस्तानचा जो मुद्दा आहे त्यात पीसीबी किंवा बीसीसीआय काही निर्णय घेऊ शकत नाही. यात संबंधित देशांचे सरकारच काय करायचं हे ठरवू शकते. याप्रकरणी आमच्या सरकारला ठरवायचं आहे. जेव्हा भारताचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे सरकार ठरवते की कुठे खेळायचं. आम्हाला हे विचारण्याने काहीच साध्य नाही होणार की आम्ही अहमदाबादमध्ये खेळणार की नाही. वेळ आल्यावर हे ठरेल. सरकार सांगेल आम्ही कुठं खेळू शकतो. आमचा निर्णय त्यावरच अवलंबून आहे असंही सेठी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात