Ashes Highlights VIDEO : 131 वर्षांत पहिल्यांदाच अशी कामगिरी, स्टोक्सनं मिळवून दिला ऐतिहासिक विजय

Ashes Highlights VIDEO : 131 वर्षांत पहिल्यांदाच अशी कामगिरी, स्टोक्सनं मिळवून दिला ऐतिहासिक विजय

बेन स्टोक्सच्या नाबाद खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावत इंग्लंडने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

  • Share this:

लीड्स, 26 ऑगस्ट : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला धक्का देत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो बेन स्टोक्स. त्याने नाबाद 135 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगज्जेत्या इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावत इंग्लंडनं ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे.

अशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटच्या 77 धावांच्या खेळीमुळं इंग्लंडचा डाव सावरला. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 67 धावांत गुंडाळल्यानंतर तिसऱ्या दिवशीच विजय मिळवण्याच्या इराद्यानं ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला होता. मात्र इंग्लंडने तिसऱ्या दिवस अखेर तीन बाद 156 धावा करत त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवले.

ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 179 धावा केल्या. तर तब्बल 71 वर्षांनी इंग्लडा लाजीरवाणा अशा केवळ 67 धावा करता आल्या. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या सलामीवीरांना ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांनी स्वस्तात माघारी पाठवले. त्यामुळं इंग्लंडची 15-2 अशी परिस्थिती आली होती. त्यानंतर कर्णधार रूटनं जो डेनलीसोबत महत्त्वपूर्ण अशी 126 धावांची भागिदारी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं जवळजवळ आपला विजय निश्चित केला होता. मात्र त्यानंतर जॉनी बेअरस्टो 36 धावा करत बाद झाला. तर, जॉस बटलर, ख्रिस वोक्स केवळ एक धाव करत बाद झाले. त्यामुळं बेन स्टोकनं पुन्हा फलंदाजीची धुरा सांभाळत 219 चेंडूत 135 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र बेन स्टोकनं ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवल्या.

पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 67 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर चौथ्या डावात त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं विजय मिळवला. याआधी 131 वर्षांपूर्वी 1888 मध्ये 67 पेक्षा कमी धावा केल्यानंतरही विजय मिळवला होता.

SPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज!

Published by: Suraj Yadav
First published: August 26, 2019, 8:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading