बर्मिंगहम, 18 जून : एशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने नाबाद शतक केलं. इंग्लंडमधलं हे त्याचं पहिलं वहिलं शतक आहे. शतकानंतर ख्वाजाने जोरदार सेलिब्रेशन केलं. त्याच्या या सेलिब्रेशनची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ख्वाजाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, इंग्लंडमध्ये धावा होत नव्हत्या तेव्हा लोकांनी ट्रोल केलं. माझं शतक झालं तेव्हा मला हे सगळं आठवत होतं. ख्वाजाने एशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस पूर्ण खेळून काढला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत 279 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या. त्याच्या य़ा खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया सध्या फक्त ८२ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद ३११ धावा झाल्या आहेत. शतकानंतर ख्वाजाने त्याची बॅट हवेत फेकली होती. टीम इंडियात संधी नाही तर तरुणांची जागा का अडवू; सिनियर खेळाडू संघातून झाला बाहेर ख्वाजा म्हणाला की, “खरंतर मी बाहेर काय चर्चा होते ते कधी वाचत नाही. पण जेव्हा मैदानावर असतो, नेट्समध्ये सराव करतो तेव्हा म्हटलं जातं की मला इंग्लंडमध्ये धावा करता येत नाहीत. लोक ट्रोल करत असतात.त्यामुळे मला इंग्लंडमधलं शतक नेहमीपेक्षा खास होतं.” ख्वाजाने WTC फायनलच्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली होती. ख्वाजाने इंग्लंडमधील कामगिरी आणि सेलिब्रेशनवर बोलताना म्हटलं की, मला वाटतं हे सेलिब्रेशन इंग्लंडमधील तीन एशेस मालिका आणि त्यातील दोन वेळा बाहेर होण्याचा परिणाम होतं. असं नाही की माझ्याकडे मला सिद्ध करण्यासाठी काही नाहीय. पण मैदानावर जाणे आणि ऑस्ट्रेलियासाठी धावा करणं चांगलं आहे. फक्त हे दाखवण्यासाठी की गेली दहा वर्षे कशी होती. तरुण खेळाडू मला तरुण ठेवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







