रांची, 28 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पराभवाचे खापर सध्या वेगवान गोलंदाज अर्शदीपवर फोडलं जात आहे. अर्शदीपने अखेरच्या षटकात दिलेल्या 27 धावा टीम इंडियाला महागात पडल्या. यामुळेच न्यूझीलंडने भारताविरुद्ध 21 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अर्शदीपने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नो बॉल टाकला. या चेंडूवर डेरिल मिशेलने षटकार मारला. त्यानतंर पुढच्या तीन चेंडूत त्याने आणखी 16 धावा काढल्या. सामन्यानंतर पुन्हा एकदा अर्शदीप सिंह त्याच्या नो बॉलमुळे चर्चेत आला आहे. न्यूझीलंडच्या आधी श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेवेळीही त्याने अनेक नो बॉल टाकले होते.
अर्शदीप सिंहकडून सतत नो बॉल टाकले गेल्यानं आता त्याच्यावर टीका होतेय. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि संजय बांगर यांनी नो बॉला मागचे कारण सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अर्शदीप मोठा रनअप घेतो. त्यामुळे क्रीजमधून तो बाहेर जातो. तसंच तो अनेकदा साइडसुद्धा चेंज करतो. कैफने अर्शदीपला सल्ला देताना म्हटलं की, त्याने आपल्या बेसिक्सवर काम करायला हवं.
हेही वाचा : अर्शदीपची शेवटची ओव्हर अन् आघाडीच्या फलंदाजांची हाराकिरी, भारताच्या पराभवाला ठरले कारण
मोहम्मद कैफ म्हणाला की, अर्शदीपचा रनअप मोठा आहे. याचा अर्थ त्याला स्टेपिंगमध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यात त्याची ताकदही खर्ची पडत आहे. त्याच्या ओव्हरस्टेप नो बॉ़लच्या मागे प्रमुख कारण त्याचा रन अप आहे. बऱ्याचदा साइड बदलतो आणि कधी कधी अराउंड द विकेट तर कधी ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. त्यामुळे अर्शदीपने बेसिक्सवर काम करण्याची आणि थोडी विश्रांती घेण्याची गरज आहे. तो चांगला गोलंदाज आहे पण त्याचा दिवस चांगला नव्हता.
हेही वाचा : टीम इंडियाला अर्शदीप पडला महागात; आधी धावांची खैरात, नंतर खाल्ले चेंडू
भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनीही कैफच्या म्हणण्याशी सहमत असल्याचं म्हटलंय. जसं कैफने म्हटलं की अर्शदीपचा रनअप गरजेपेक्षा जास्त आहे. एका गोलंदाजाला यामागचे कारण शोधण्याची गरज आहे. वेगवान गोलंदाज असाल आणि शरीरात जास्त ताकद नसेल तर वेग मिळवण्यासाठी लांब अतरावरून पळा असंही बांगर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.