मुंबई, 29 मे : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी बंगळुरूत एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. या इव्हेंटमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ मजेशीर असा आहे. यात अनुष्काने विराटचं नाव काय नावाने फोनमध्ये सेव्ह केलंय हे सांगितलंय. मात्र यातही एक ट्विस्ट आहे. तो म्हणजे विराट अनुष्काला या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे चुकीची द्यायची होती. विराट कोहलीला त्याचे नाव विचारले तर त्याने गजोधर असं सांगितलं. त्यानंतर अनुष्काला तिने पतीचे नाव काय म्हणून सेव्ह केलंय असं विचारलं. यावर तिने पती परमेश्वर असं उत्तर दिलं. यावर अनुष्का पुढे म्हणाली की, ओजी और सुनिए जी. विराट कोहलीलासुद्धा हाच प्रश्न विचारला गेला. त्याने डार्लिंग असं उत्तर दिलं. या उत्तरावर प्रेक्षकांनी दिलेल्या रिएक्शनवर विराट म्हणाला की, हे चुकीचं उत्तर आहे आणि मी तुम्हाला खरं इथं सांगणार नाही. विराट कोहलीचं हे बोलणं ऐकूण अनुष्काला हसू आवरलं नाही. …तर कदाचीत सचिन मिळाला नसता, दिग्गजांशी तुलनेवर शुभमन गिलने दिली प्रतिक्रिया कार्यक्रमात अनुष्काने तिच्या बँड बाजा बारात या चित्रपटातला एक डायलॉगही बोलून दाखवला. यावर विराट कोहलीने रणवीर सिंहच्या स्टाइलमध्ये उत्तर देत सर्वांनाच चकीत केलं. अनुष्काने म्हटलं की, प्यार, व्यापार की जोडी कभी नहीं बैठती. ना भैया, मैं तो सिंगल ही बेस्ट हू.’ यावर विराटने उत्तर दिलं की, बिझनेस कर ले मेरे साथ, ब्रेड पकौडे की कसम. कभी धोका नहीं दूँगा.
Fun moments between Virat Kohli and Anushka Sharma.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 27, 2023
Anushka imitating Virat's celebration was the best! pic.twitter.com/e3ono4oXlG
अनुष्काने यावेळी विराट कोहलीची मैदानातील सेलिब्रेशन स्टाइल कशी असते ते दाखवलं. यावेळी अनुष्का स्टेजवर जोरजोराद उड्या मारत ओरडायला लागली. यानंतर ती म्हणाली की विराट कधी कधी बॉलर पेक्षा जास्त एक्साइटेड होतो. तर विराट म्हणतो की सेलिब्रेशननंतर कधी कधी नंतर लाजही वाटते. विराट कोहली आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जून या कालावधीत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होणार आहे. विराट कोहली आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही हा फॉर्म कायम राखण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.