मुंबई, 28 ऑगस्ट: आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला अभिनेता आणि समीक्षक केआरके म्हणजेच कमाल आर खान. तो सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. त्याच्या निशाण्यावर नेहमीच कोणी ना कोणी कायमच असतं. अशातच केआरकेनं क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मावर निशाणा साधला आहे. यावेळी केआरकेनं विराटच्या नैराश्याविषयी अनुष्काला जबाबदार ठरवलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
'विराट कोहली हा भारतातील पहिला क्रिकेटर आहे ज्याला डिप्रेशनची समस्या आहे. एका नायिकेशी लग्न केल्याचा हा परिणाम आहे. अनुष्काने आता ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे की त्याला (विराट) डिप्रेशनची समस्या आहे', असं ट्विट केआरकेनं केलं होतं. मात्र अनेकांनी त्याला निशाण्यावर घेतलं त्यानंतर केआरकेनं हे ट्विट डिलीट केलं.
केआरके इथेच थांबला नाही, त्याने आणखी एक ट्विट केले आणि लिहिले, 'उत्तर भारताचा एक मजबूत मुलगा (विराट कोहली) कसा डिप्रेशन झाला'. त्यानंतर त्याने पुन्हा एक फॉलोअप ट्विट करत संघाच्या निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केले. 'मला वेळ सापडत नाही, जेव्हा विराट कोहलीने स्वत: सांगितले की तो डिप्रेशनचा बळी आहे, मग 2022 मध्ये आशिया कप का, निवडकर्त्यांनाही नैराश्याची समस्या आहे का?'. त्याच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत असून त्याच्यावर अनेक टीकास्त्र डागलं जात आहे.
हेही वाचा- Sonali Phogat: सोनाली प्रकरणात पाचव्या आरोपीची मोठी कबुली; ड्रग्स चेनचा भांडाफोड
दरम्यान, 'मला खात्री आहे की डिप्रेशनने ग्रस्त असलेला तो भारतातील पहिला क्रिकेटर नाही, प्रत्येक गोष्टीसाठी अनुष्काला दोष देणे थांबवा', अशा अनेक प्रकारच्या कमेंट विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांकडून येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Depression, Social media, Virat kohali