जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Wrestlers Protest : '15 जूनपर्यंत चौकशी..' सरकारचं आश्वासन; तोपर्यंत पैलवानांना मानावी लागणार एक अट

Wrestlers Protest : '15 जूनपर्यंत चौकशी..' सरकारचं आश्वासन; तोपर्यंत पैलवानांना मानावी लागणार एक अट

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर

Wrestlers Protest : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंना आश्वासन दिले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याबाबत सुरू असलेली चौकशी लवकरच पूर्ण केली जाईल. 15 जूनपर्यंत पोलीस तपास पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले असून तोपर्यंत आंदोलन केले जाणार नाही, असे पैलवानांनी सांगितले.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 जून : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यात बुधवारी बैठक झाली. यानंतर 15 जूनपर्यंत पोलीस तपास पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले असून तोपर्यंत कोणतेही आंदोलन होणार नसल्याचे पैलवानांनी सांगितले. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना अटक करण्याची मागणी करणाऱ्या कुस्तीपटूंनी सांगितले की, त्यांना आश्वासन देण्यात आले आहे. पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू होता, तो 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. क्रीडामंत्र्यांनी आंदोलक कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावले होते. पैलवानांसोबत क्रीडामंत्र्यांची बैठक अनुराग ठाकूर म्हणाले की मी कुस्तीपटूंना आमंत्रित केले आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली. 6 तास चाललेल्या या बैठकीत आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा केली. चर्चा झालेल्या मुद्द्यांमध्ये आरोपांची चौकशी पूर्ण करून 15 जूनपर्यंत दोषारोपपत्र द्यावे आणि 30 जूनपर्यंत निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले आहे. अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी, ज्याचं अध्यक्षपद महिलेकडे असावे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत चांगले पदाधिकारी निवडले पाहिजेत, त्यासाठी खेळाडूंचे मत घेतले पाहिजे. ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी संबंधित लोक संघावर येऊ नये, ही त्यांची मागणी होती. खेळाडूंवरील खटले मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी आमच्या सर्वांच्या सहमतीने घडल्या आहेत. वाचा - Cricket News : आधी केली वादग्रस्त पोस्ट, नंतर मागितली माफी, गुजरातच्या खेळाडूने नेमकं काय केलं? ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या अटकेविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन जोपर्यंत WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना तुरुंगात टाकले जात नाही तोपर्यंत ते आंदोलन करत राहतील, असे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. तपासाची गती संथ असल्याचा पैलवानांचा आरोप होता. कुस्तीपटू विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी सातत्याने ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांनी सरकारने ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत म्हटले होते- “सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास उत्सुक आहे. मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे."

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sport , Wrestler
  • First Published :
जाहिरात
जाहिरात