जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket News : आधी केली वादग्रस्त पोस्ट, नंतर मागितली माफी, गुजरातच्या खेळाडूने नेमकं काय केलं?

Cricket News : आधी केली वादग्रस्त पोस्ट, नंतर मागितली माफी, गुजरातच्या खेळाडूने नेमकं काय केलं?

आधी केली वादग्रस्त पोस्ट, नंतर मागितली माफी, गुजरातच्या खेळाडूने नेमकं काय केलं?

आधी केली वादग्रस्त पोस्ट, नंतर मागितली माफी, गुजरातच्या खेळाडूने नेमकं काय केलं?

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. यानंतर ट्रोल झाल्याने त्याने ही पोस्ट डिलीट करत माफी मागितली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 मे : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा सीजन काही दिवसांपूर्वीच पारपडला. यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने बाजी मारून आयपीएलच्या विजेत्या ट्रॉफीवर नाव कोरले. परंतु आयपीएलनंतर गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुने शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे खळबळ उडाली. यश दयाल याने ती स्टोरी काही वेळातच डिलीट केली असली तरी त्याचा स्क्रीन शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. द्वेष पसरवणाऱ्या या इन्स्टा स्टोरीबद्दल यश दयाल याने चाहत्यांची माफीही मागितली आहे. ही पोस्ट चुकून शेअर झाल्याचे त्याने लिहिले. आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यावेळी यश दयाल सामन्यातील शेवटची ओव्हर टाकत होता. यावेळी केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंहने यशने टाकलेल्या 5 चेंडूंवर 5 सिक्स मारले. यामुळे केकेआरने हा सामना जिंकला होता, यानंतर यश दयाल चर्चेत आला होता. यश दयालने त्याच्या सोशल मीडियावर लव्ह जिहादला घेऊन एक पोस्ट शेअर केली होती. परंतु काही वेळाने यशने ही स्टोरी डिलीट केली. लव्ह जिहाद संदर्भातील ही स्टोरी शेअर केल्यानंतर यश दयाल हा लोकांच्या धार्मिक भावना भडकवत असल्याचा आरोप झाला आणि त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागेल.

News18

News18लोकमत
News18लोकमत

स्टोरी डिलीट केल्यानंतर यशने याविषयी सोशल मीडियावरून माफी मागितली. त्याने लिहिले की, " मित्रांनो माझ्याकडून चुकून शेअर झालेल्या स्टोरीबद्दल मी माफी मागतो. कृपया द्वेष पसरवू नका. मी सर्व धर्मांचा आदर करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात