दुबई, 5 सप्टेंबर**:** रविवारचा भारत वि. पाकिस्तान महामुकाबला शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला. पण ऐन मोक्याच्या क्षणी असिफ अलीचा सुटलेला झेल सामन्यातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यामुळे भारतानं सामनाही गमावला आणि सुपर फोर फेरीत पाकिस्ताननं पहिला विजय साजरा केला. या सामन्यात भारताची गोलंदाजीही कमकुवत ठरली. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहलसारख्या अनुभवी गोलंदाजांनी दहापेक्षा जास्त इकॉनॉमी रेटनं धावा मोजल्या. पण या पराभवाचं खापर फुटलं ते सोपा झेल सोडणाऱ्या अर्शदीप सिंगवर. झेल सोडल्यामुळे अर्शदीप सिंग सोशल मीडियात प्रचंड ट्रोल झाला. पण हे सगळं भारतातील जातीय तेढ वाढवण्यासाठी कुणीतरी पाकिस्तानमधून करत असल्याचा संशय आहे. यादरम्यान अर्शदीपच्या समर्थनात माजी कसोटीवीर आणि टेलिव्हिजन कॉमेंटेटर आकाश चोप्रासह अनेक माजी क्रिकेटर्स पुढे आले आहेत. झेल सुटला, सामना गमावला 17 व्या षटकात हार्दिक पंड्यानं सेट बॅट्समन मोहम्मद रिझवानला माघारी धाडलं. त्यानंतर असिफ अली मैदानात आला. पण 18 व्या ओव्हरमध्ये रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर थर्डमॅनला उभ्या असलेल्या अर्शदीप सिंगनं एक सोपा झेल सोडला. असिफ अलीनं त्यावेळी खातंही खोललं नव्हतं. पण त्यानंतर त्यानं 8 चेंडूत 16 धावा फटकावल्या आणि पाकिस्तानचा विजय सोपा केला. सोशल मीडियात अर्शदीप ट्रोल भारतीय संघानं सामना गमावल्यानंतर सोशल मीडियात अर्शदीप सिंग मात्र सर्वांच्या निशाण्यावर आला. सोपा झेल सोडल्यामुळे तो प्रचंड ट्रोल झाला. अवघ्या 23 वर्षांच्या या युवा खेळाडूच्या विकीपीडिया अकाऊंटशीही काही विकृतांनी छेडछाडही केली आणि त्याचा खलिस्तानी असाही उल्लेख केला. हे पाकिस्तानमधून कुणीतरी जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं केल्याचा संशय आहे. कारण अर्शदीपला ट्रोल करणारे बरेच ट्विट्स हे पाकिस्तानी अकाऊंट्सवरुन असल्याचं दिसत आहे. सध्या या प्रकरणाची चौकशीही सुरु झाली आहे.
Wikipedia page of Indian Player Arshdeep Singh has been edited & deliberately Khalistan is added.
— Anshul Saxena (@AskAnshul) September 4, 2022
Who is behind this editing & targeting Arshdeep Singh?
Someone from Pakistan.
Here are the IP details of editor. pic.twitter.com/CErervW3Q2
आकाश चोप्रानं बदलला डीपी या सगळ्या प्रकारानंतर भारतीय संघाचा माजी कसोटीवीर आणि सध्याचा प्रसिद्ध टीव्ही कॉमेंटेटर आकाश चोप्रा अर्शदीपच्या समर्थनात पुढे आला आहे. आकाशनं आपल्या ट्विटर हॅन्डलवरचा डीपी बदलून त्याठिकाणी अर्शदीपचा फोटो लावला आहे.
#NewProfilePic pic.twitter.com/ksSXCNMOgC
— Aakash Chopra (@cricketaakash) September 5, 2022
Koo AppNobody drops a catch on purpose. The one who ends up dropping one (mistakenly)…especially in a game against Pakistan is the one who’s hurt the most. Anyone who’s having a go at young Arshdeep is doing a huge disservice to this game and exposing their own understanding or the lack of it. #AakashVani - Aakash Chopra (@cricketaakash) 5 Sep 2022
इतकच नव्हे तर आकाश चोप्रानं ट्रोल करणाऱ्यांना चांगलच सुनावलं आहे. ‘कुणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही. ज्याच्याकडून हे होतं त्यालाच सर्वात जास्त त्याचं दु:ख होतं. त्यामुळे अर्शदीपवर जो कुणी आरोप करत आहेत ते या खेळाचा अपमान करत आहेत आणि स्वत:चे विचार किती कमकुवत आहेत हे दाखवून देत आहेत.’ असं आकाश चोप्रानं म्हटलंय. आकाशसह इरफान पठाण आणि हरभजन सिंग या माजी क्रिकेटर्ससह विराट कोहलीनंही युवा अर्शदीपची पाठराखण केली आहे.