जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ajinkya Rahane : दुसऱ्यांदा बाबा होणार अजिंक्य रहाणे, दिवाळी होणार आणखी गोड!

Ajinkya Rahane : दुसऱ्यांदा बाबा होणार अजिंक्य रहाणे, दिवाळी होणार आणखी गोड!

Ajinkya Rahane : दुसऱ्यांदा बाबा होणार अजिंक्य रहाणे, दिवाळी होणार आणखी गोड!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) दिवाळी आणखी गोड होणार आहे. आपण दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची माहिती स्वत: अजिंक्यनेच दिली आहे. इन्स्टाग्रामवर रहाणेची पत्नी (Ajinkya Rahane Wife) राधिकाने एक फोटो शेअर करून ही गूड न्यूज दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जुलै : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) दिवाळी आणखी गोड होणार आहे. आपण दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची माहिती स्वत: अजिंक्यनेच दिली आहे. इन्स्टाग्रामवर रहाणेची पत्नी (Ajinkya Rahane Wife) राधिकाने एक फोटो शेअर करून ही गूड न्यूज दिली आहे. राधिकाने अजिंक्यला टॅग करत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजिंक्य, राधिका आणि त्यांची मुलगी दिसत आहे. या फोटोमध्ये राधिका प्रेग्नंट दिसत आहे. तसंच तिघंही या फोटोमध्ये खूश दिसत आहेत. कधी येणार नवीन पाहुणा या पोस्टमध्ये राधिकाने घरात नवीन पाहुणा केव्हा येणार याचा खुलासा केला आहे. पोस्टमध्ये राधिकाने त्या महिन्याचं नावही लिहिलं आहे. ऑक्टोबर महिन्यात राधिका आई होणार आहे. याच महिन्यात 24 ऑक्टोबरला दिवाळीदेखील आहे.

जाहिरात

राधिकाच्या या पोस्टवर आयपीएलची रहाणेची टीम केकेआर, रोहित शर्माची पत्नी रितिका, मयंक अग्रवालची पत्नी आशिता सूद, बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि अश्विनची पत्नी प्रिती यांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. अजिंक्य रहाणेचं रेकॉर्ड 82 टेस्ट, 4,931 रन, 38.52 सरासरी 90 वनडे, 2,962 रन, 35.26 सरासरी 20 टी-20, 375 रन, 20.83 सरासरी ऑक्टोबर 2019 ला मुलीचा बाबा अजिंक्य रहाणेने 26 सप्टेंबर 2014 साली राधिकासोबत लग्न केलं. याच्या 5 वर्षांनंतर 2019 साली हे दोघं मुलीचे आई-बाबा बनले. अजिंक्यच्या मुलीचा जन्म 5 ऑक्टोबर 2019 ला झाला. याच्या 3 वर्षांनी ऑक्टोबर महिन्यातच त्यांच्या दुसऱ्या बाळाचाही जन्म होणार आहे. रहाणेचा संघर्ष अजिंक्य रहाणे एका दशकापासून टीम इंडियाचा भाग आहे. पण मागच्या काही काळापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. खराब फॉर्ममुळे त्याचं टेस्ट टीमचं उपकर्णधारपद गेलं, यानंतर त्याला टेस्ट टीममधूनही बाहेर करण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात