जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / वसीम जाफर वादावर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वसीम जाफर वादावर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वसीम जाफर वादावर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) याचे उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनसोबत (Uttarakhand Cricket Association) वाद झाल्यानंतर त्याने प्रशिक्षकपद सोडलं. या वादावर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 13 जानेवारी : टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) याचे उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनसोबत (Uttarakhand Cricket Association) वाद झाल्यानंतर त्याने प्रशिक्षकपद सोडलं. प्रशिक्षकपद सोडल्यानंतर वसीम जाफरवर असोसिएशनने गंभीर आरोप केले. वसीम जाफरने टीममध्ये मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य द्यायचे प्रयत्न केले, असं उत्तराखंडकडून सांगण्यात आलं. वसीम जाफरने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले. याबाबत वसीम जाफरचा माजी सहकारी आणि टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला विचारण्यात आलं, पण याबाबत रहाणेने प्रतिक्रिया देणं टाळलं. ‘मला या प्रकरणाबाबत काहीही माहिती नाही. नक्की काय झालं आहे, याची कल्पना नसताना मी या विषयावर बोलणार नाही,’ असं अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. जाफर आणि अजिंक्य रहाणे मुंबईकडून, वेस्ट झोन आणि इंडियन ऑईल कॉरपोरेशनकडून क्रिकेट खेळले आहेत. दुसरीकडे अनिल कुंबळे, इरफान पठाण, मनोज तिवारी आणि मुंबईचे माजी क्रिकेटपटू शिशीर हट्टंगडी यांनी वसीम जाफरला पाठिंबा दिला आहे. काय झाला वाद? भारताकडून 31 टेस्ट खेळणारा वसीम जाफर म्हणाला, ‘उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांच्या आरोपांमुळे मला त्रास झाला आहे.’ टीम निवडीमध्ये हस्तक्षेप होत असल्यामुळे आणि निवड समिती आणि उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप करत वसीम जाफरने मंगळवारी राजीनामा दिला होता. ‘या प्रकरणाला जो काही धार्मिक रंग दिला जात आहे, ते खूप दु:खद आहे. मी इक्बाल अब्दुल्लाचं समर्थन करतो आणि त्याला कर्णधार बनवू इच्छित होतो, हा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे,’ असं जाफर ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाला. उत्तराखंड टीमच्या सराव सत्रात मौलवींना आणल्याचा आरोपही जाफरने फेटाळून लावला आहे. ‘बायो बबलमध्ये मौलवी आले आणि आम्ही नमाज पठण केलं. मौलवी, मौलाना देहरादूनच्या शिबिरात दोन-तीन शुक्रवार आले, पण त्यांना मी बोलावलं नव्हतं,’ असं स्पष्टीकरण जाफरने दिलं. ‘इक्बाल अब्दुल्लाने नमाजासाठी माझी आणि मॅनेजरची परवानगी मागितली होती. आम्ही रोज खोलीतच नमाज पठण करायचो, पण शुक्रवारचा नमाज एकत्र व्हायचा. नेट प्रॅक्टिसनंतर आम्ही पाच मिनिटं ड्रेसिंग रूममध्ये नमाज पठण केलं. जर हे सांप्रदायिक असतं, तर नमाजासाठी मी सरावाची वेळ बदलली असती, पण मी तसं केलं नाही. यात काय मोठी गोष्ट आहे, मला समजलं नाही,’ अशी प्रतिक्रिया जाफरने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात