सिडनी, 12 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये सध्या दोन ते तीन फलंदाज आहेत, ज्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. मात्र कोणताही फलंदाज हा परफेक्ट नसतो. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाला संघाचे सर्व खेळाडू सध्या डेज टुर्नामेंट शेफिल्ड शील्ड खेळत आहेत. यात ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथही आहे. या स्पर्धेत स्मिथनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधली सर्वात धीमे शतक केले. मात्र शतक लगावूनही स्मिथ ज्या पध्दतीनं बाद झाला, तो व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ऑस्ट्रेलिया संघाचा शानदार फलंदाज आणि कसोटी रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या स्मिथनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. पाक विरोधात 15 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधीच शतकी खेळी केली आहे. सिडनीच्या मैदानावर झालेल्या एका सामन्यात स्मिथनं 290 चेंडूत आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधले 42वे शतक लगावले. हे स्मिथच्या करिअरमधले सर्वात धिमे शतक आहे. वाचा- बांगलादेशसी भिडण्याआधी विराटची इंदूरमध्ये मुलांसोबत धम्माल मॅच, पाहा PHOTOS याआधी स्मिथनं 261 चेंडूत इंग्लंड विरोधआत 2017मध्ये शतकीय खेळी केली होती. मात्र आता स्मिथ त्याच्या शतकी खेळीमुळे नाही तर बाद होण्याच्या पध्दतीमुळं चर्चेत आला आहे. 295 चेंडूत 103 धावा करत स्मिथला बाद घोषित करण्यात आले. खरतर स्मिथ बाद नव्हताच, मात्र पंचांच्या चुकीमुळं त्याला बाद घोषित करण्यात आले. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं शेअर केला आहे. वाचा- भारतात चेंडूशी छेडछाड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा 4 सेकंदाचा VIDEO VIRAL
NEVER tell Steve Smith he has to stop batting!
— cricket.com.au (@cricketcomau) November 12, 2019
A bizarre dismissal brings the right-hander's 42nd first-class century to an end #SheffieldShield pic.twitter.com/KNEDpjtiFp
वाचा- चड्डी घालून नवा मोगली करतोय सचिनसारखी तुफानी बॅटिंग! पाहा VIRAL VIDEO स्मिथ हा असा फलंदाज आहे जो सहसा लवकर बाद होत नाही. मात्र यावेळी पंचांनी दिलेल्या निर्णयामुळं त्याला घोषित करण्यात आले. New South Walesचा फलंदाज स्मिथ गोलंदाज मार्क स्टॉइनसच्या चेंडूवर कट मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विकेटकीपर जोशनं कॅच पकडला आणि अपील केले. ज्यावर पंचांनी बाद असल्याचे सांगितले. मात्र रिप्लेमध्ये बॅट आणि बॉल यांचा संपर्क होत नसल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळं बाद झाल्यानंतर स्मिथनं नाराजी व्यक्त केली.

)







