मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Rituraj Gaikwad-Sayali Sanjeev च्या लग्नाच्या चर्चांना उधाण, सायलीच्या त्या VIDEO वर कमेंट्सचा पाऊस

Rituraj Gaikwad-Sayali Sanjeev च्या लग्नाच्या चर्चांना उधाण, सायलीच्या त्या VIDEO वर कमेंट्सचा पाऊस

काय ऋतुराज सायली लग्न करतायत? Sayali Sanjeev च्या 'त्या' व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ

काय ऋतुराज सायली लग्न करतायत? Sayali Sanjeev च्या 'त्या' व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील गोड चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सायली संजीव (Actress Sayali Sanjeev ) आणि आयपीएलमधील धडाकेबाज फलंदाच ऋतुराज गायकवाड(CSK player Rituraj Gaikwad) यांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील गोड चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सायली संजीव (Actress Sayali Sanjeev ) आणि आयपीएलमधील धडाकेबाज फलंदाच ऋतुराज गायकवाड(CSK player Rituraj Gaikwad) यांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली आहे. दरम्यान, आता या चर्चेने नवे वळण घेतले आहे. दोघे आता लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा (Actress Sayali Sanjeev has shared a video of Mehndi on social media)सुरु झाली आहे.

इन्स्टाग्रामवर नेहमी सक्रिय असणाऱ्या सायलीने नुकतचं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती हातावर मेहंदी काढताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर सायलीने या व्हिडिओला 'मेहँदी है रचनेवाली, हाथों में गहरी लाली' या गाण्याची जोड दिली आहे.

तिच्या या पोस्टमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. सायलीच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 'ऋतुराज पुण्याला आला म्हणुन का? ऋतु के नाम की मेहंदी रच रही है शायद अशा कमेंट्स तिच्या पोस्टवर पडत आहेत.

बऱ्याच दिवसांपासून सायली संजीवचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे. सायली च्या इंस्टाग्रामवरील फोटोवर ऋतुराजने कमेंट केल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तेव्हापासून सायलीच्या कोणत्याही पोस्टवर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शी संबधीत कमेंट केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सायली साडीतील काही फोटो शेअर करत आहे. नुकतेच हिरव्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. कुणी सायली संजीवच्या फोटोवर ऋतुराणी, तर कुणी परमसुंदरी आणि गायकवाड वहिनी अशी कमेंट्स करताना दिसत आहे.

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला. याचसोबत एमएस धोनीच्या सीएसकेने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन बनवण्यात ऋतुराज गायकवाडने मोलाची कामगिरी केली.

आयपीएल गाजवून पुण्यात आल्यानंतर ऋतुराजचं फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं. त्यामुळे ऋतु सध्या पुण्यात आहे. आणि सायली रोज नवनव्या फोटोशुने चाहत्यांना घायाळ करत आहे. त्यामुळे दोघे लवकच लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

First published:

Tags: Csk, IPL 2021, Marathi entertainment, Sayali Sanjeev