• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'मी अर्धा भारतीय...' डिव्हिलियर्सच्या 'या' एका गोष्टीने सर्व भारतीयांची मनं जिंकली

'मी अर्धा भारतीय...' डिव्हिलियर्सच्या 'या' एका गोष्टीने सर्व भारतीयांची मनं जिंकली

AB de Villiers

AB de Villiers

दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) स्वतःला भारतीय असे संबोधले. त्याची ही प्रतिक्रिया पाहता भारतीय चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers ) शुक्रवारी अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याने ही निवृत्ती सोशल मीडियावर जाहिर केली. सध्या त्याची ही रिटायरमेंटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणचे त्याच्या या पोस्टमधील एका शब्दाने आणि त्याच्या त्यावरच्या प्रतिक्रियेने त्याने सर्व भारतीयांची मनं जिंकली आहेत. डिव्हिलियर्सने शुक्रवारी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. डिव्हिलियर्सने ज्या ट्विटमध्ये निवृत्तीची घोषणा केली ते खूप खास आहे. डिव्हिलियर्सने तीन भाषांमध्ये चाहत्यांचे आभार मानले, त्यापैकी एक हिंदी आहे. डिविलियर्स ने शुक्रवार को सोशल मीडिया पर अपने संन्यास का ऐलान किया. डिविलियर्स ने जिस ट्वीट में संन्यास का ऐलान किया वो बेहद ही खास है. डिविलियर्स ने तीन भाषाओं में फैंस को शुक्रिया कहा, जिसमें से एक हिंदी है. यासंदर्भात बोलताना डिव्हिलियर्सने स्वतःच याचा खुलासा केला आहे. त्याने स्वतःला भारतीय असे संबोधले. डिव्हिलियर्स म्हणाला, 'मी अर्धा भारतीय आणि अर्धा दक्षिण आफ्रिकेचा आहे. मी दक्षिण आफ्रिकेत राहीन पण माझ्या हृदयात भारताचे विशेष स्थान आहे. अर्धा भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.' अशी प्रतिक्रीया त्याने यावेळी व्यक्त केली. त्याची ही प्रतिक्रिया पाहता भारतीय चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याचे हे वक्तव्य अभिमानाने गर्व भारतीयांच्या मनात गर्व करत आहे. डिव्हिलियर्स निवृत्तीनंतर म्हणाला, 'मी नेहमी आरसीबीचाच राहीन. माझ्यासाठी आरसीबीशी संबंधित प्रत्येकजण कुटुंबासारखा आहे. लोक येत-जात राहतात पण आरसीबीवरील लोकांचे प्रेम कायम राहील. मी अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हि़डीओ आरसीबीने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामन्यांमध्ये 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151 पेक्षा जास्त होता आणि त्याच्या बॅटने 3 शतके, 40 अर्धशतके झळकावली आहेत.
  एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. 'माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत मी हा खेळ खूप एन्जॉय केला आहे. अशा आशयाची पोस्ट डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर केली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: