सिडनी, 07 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर एरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीच्या आधी त्याने निवृत्तीची घोषणा केलीय. एरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्याने ऑस्ट्रेलियाकडून २५४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
फिंचने ऑस्ट्रेलियाकडून ५ कसोटी, १४६ एकदिवसीय आणि १०३ टी२० सामने खेळले. फिंचने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ७६ टी२० सामन्यांचे नेतृत्व केले. याशिवाय कर्णधार म्हणून ५५ एकदिवसीय सामने खेळला. फिंचने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७ तर टी२० मध्ये दोन शतके झळकावली असून एकूण ८ हजार ८०४ धावा केल्या आहेत. त्याने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
हेही वाचा : बापलेकाची कसोटीत कमाल! मुलाने द्विशतक झळकावताच झाला विश्वविक्रम
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याने निवृत्तीची घोषणा करताना तो म्हणाला की, मला जाणीव झाली की मी टी२० वर्ल्ड कप २०२४ च्या संघात नसेन, त्यामुळे मला वाटलं की निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. संघ व्यवस्थापनाला त्यांच्या ध्येयाच्या दिशेने तयारी करण्यासाठी वेळ मिळेल. मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानेन ज्यांनी या क्रिकेट कारकिर्दीत माझं समर्थन केलं आणि माझ्यासोबत उभा राहिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket