वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलच्या मुलाने नाबाद द्विशतक झळकावलं.
2/ 6
तेगनारायण आणि शिवनारायण या बापलेकाच्या नावावर विश्वविक्रम नोंद झाला. तेगनारायण चंद्रपॉलने झिम्बॉब्वेच्या गोलंदाजीचा समाचार घेत ४६५ चेंडूत नाबाद २०७ धावा केल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि ३ षटकार मारले.
3/ 6
तेगनारायणचे वडील शिवनारायणने मार्च २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात नाबाद २०३ धावा केल्या होत्या. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत तेगनारायणने द्विशतक केलं.
4/ 6
तेगनारायणने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या सामन्यात ही कामगिरी केलीय. विशेष म्हणजे त्याचं हे पहिलंच शतक होतं. अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडिजचा तिसरा फलंदाज ठरलाय.
5/ 6
शिवनारायण आणि तेगनारायण या बापलेकांनी त्यांचं द्विशतक अनोख्या पद्धतीने पूर्ण केलं. शिवनारायण यांनी चौकार मारत तर तेगनारायणने षटकार मारत २०० धावा पूर्ण केल्या.
6/ 6
तेगनारायणने आतापर्यंत ५ डाव खेळले असून यात द्विशतक केलंय. तर शिवनारायण यांना पहिल्या कसोटी शतकासाठी ८ वर्षे ५२ डाव खेळावे लागले होते. चंद्रपॉल यांनी कसोटीत १६४ सामने खेळताना ११८६७ धावा केल्या होत्या. यात ३० शतकांचा समावेश आहे.