मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /...म्हणून बुमराहला WTC Final मध्ये मिळाली नाही विकेट, समोर आलं कारण

...म्हणून बुमराहला WTC Final मध्ये मिळाली नाही विकेट, समोर आलं कारण

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) मागील महिन्यात साउथम्पटनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून 8 विकेटने पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) टीकेचे लक्ष्य केले जात आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 6 जुलै : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) मागील महिन्यात साउथम्पटनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून 8 विकेटने पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) टीकेचे लक्ष्य केले जात आहे. भारताला 8 वर्षांपासून असलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ हटवण्याची ही नामी संधी होती, मात्र टीमच्या पदरी निराशा पडली. या पराभवानंतर जसप्रीत बुमराह चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला.

    27 वर्षीय पेसर जसप्रीत बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एकही विकेट मिळवू शकला नाही. बुमराहने पहिल्या डावात 26 ओव्हरमध्ये 57 रन तर दुसऱ्या डावात 10.2 ओव्हरमध्ये 35 रन दिले. साऊथम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या मुकाबल्यात बुमराहचा फॉर्म टीमच्या पराभवाचा मुख्य कारण ठरल्याचं बोललं गेलं. बुमराहकडे स्विंगची (Swing) कमतरता पाहायला मिळाली. भारताच्या पुढील टेस्ट सीरीजपूर्वी भारतीय टीमचा माजी ओपनर आणि सध्याचा कॉमेंटेटर आकाश चोप्राने (Akash Chopra) बुमराहचा संघर्ष आणि अपुऱ्या स्विंगबाबत आपले मत मांडले. भारत आणि इंग्लड (India vs England) यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान 5 मॅचेसची सीरीज खेळली जाणार आहे.

    युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, 'जसप्रीत बुमराह हा एक खास बॉलर आहे, यात काहीच शंका नाही. तो त्याच्या स्वतःच्या तुलनेत अद्वितीय आहे. तो एक शानदार बॉलर आहे. परंतु, त्याचा चेंडू हवेत वेगात असतो. तो आपला हात सरळ ठेवतो. त्यामुळे बॉल एकदम सरळ जातो, म्हणून त्याला स्विंग मिळत नाही. त्याने इंग्लिश उन्हाळी हंगामाच्या पूर्वार्धात आपल्या चेंडूला अधिक मुव्हमेंट देणं गरजेचं आहे, कारण चेंडू पिचवर पडताच त्याचा वेग थोडा कमी होतो. त्यामुळे बॅट्समनला तो खेळणं अधिक सोपं जातं.'

    4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड टेस्ट सीरिजसाठी (England Test Series) आकाश चोप्राने बुमराहला पाठिंबा दिला असून, तो या टेस्ट सीरिजमध्ये उत्कृष्ट खेळी करेल, असे आकाश चोप्राने म्हटलं आहे. इंग्लंडमधील उन्हाळ्यातील दुसऱ्या सहामाहीत जर त्याने या गतीने बॉलिंग केली तर हवेची गती त्याला उपयुक्त ठरेल, कारण यामुळे बॉल फिरण्यास मदत होते. बुमराहचा सर्वोत्कृष्ट खेळ पाहण्यासाठी आपल्याला अजून थोडं धैर्य ठेवावं लागेल. यापेक्षा अधिक मी त्याच्या खेळाविषयी बोलू शकत नाही, असे चोप्राने सांगितले.

    जसप्रीत बुमराह देखील भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज मध्ये आपल्या टीकाकारांना योग्य ते उत्तर देण्यास उत्सुक असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्रातील टीम इंडियाची ही पहिलीच संधी असेल. टीम इंडियाला 2007 नंतर इंग्लंडच्या भूमीवर एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आली नाही. 2018 साली विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा 4-1 ने पराभव झाला होता.

    First published:
    top videos

      Tags: India vs england, Jasprit bumrah, Team india