मुंबई, 16 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात काल झालेला तिसरा वनडे सामना 317 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने श्रीलंकेला वनडे सामन्यात व्हाईट वॉश दिला. मात्र हा सामना जिंकण्याचे सर्वाधिक श्रेय हे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचे आहे. विराटने या सामन्यात दमदार खेळी करून केवळ 110 चेंडूत 166 धावा केल्या. या दरम्यान त्याने वनडे मालिकेतील त्याचे 46 वे तर आंतरराष्ट्रीय सामन्यातील 74 वे शतक पूर्ण केले. तसेच श्रीलंके विरुद्ध विजयासह धावांच्या इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा न्यूझीलंडचा विक्रम भारताने मोडला. भारताने दिलेल्या 390 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 22 षटकात केवळ 73 धावा करत माघारी परतला. हे ही पहा : आज ना उद्या महाराष्ट्र केसरी होऊन दाखवेन; पंचांच्या निर्णयावर काय म्हणाला सिकंदर? श्रीलंके विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाची फलंदाजी सुरु असताना विराट कोहलीचे दोन फॅन्स हे स्टेडियमवरील सुरक्षा तोडून मैदानात धावत आले.
त्यांनी धावतपळत मैदानावर फिल्डिंग करणाऱ्या विराटला गाठले. विराटच्या या जबर फॅनला पाहून मैदानावरील इतर खेळाडू आश्चर्य चकित झाले. या फॅनने विराटाचे पाय धरले आणि त्याची गळाभेट घेतली.
एवढेच नव्हे तर यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या सूर्यकुमार यादवने विराट आणि त्याच्या चाहत्याचा मोबाईल मध्ये फोटो देखील काढला. श्रीलंका विरुद्ध सामन्यादरम्यान झालेल्या या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.