मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /42 व्या वर्षी इजिप्तच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक; Network18 च्या चॅम्पियन सरस्वती आनंद यांची प्रेरणादायी कहाणी

42 व्या वर्षी इजिप्तच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक; Network18 च्या चॅम्पियन सरस्वती आनंद यांची प्रेरणादायी कहाणी

वयाच्या ४२ व्या वर्षी इजिप्तमधील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक

वयाच्या ४२ व्या वर्षी इजिप्तमधील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक

बेंगळुरू येथील 42 वर्षीय पॉवरलिफ्टर सरस्वती आनंद यांनी इजिप्तमधील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी 100 किलो वजन उचलून गोल्ड मेडल जिंकलं आहे. सरस्वती यानिमित्ताने असंख्य महिला वर्गासाठी प्रेरणादायी ठरल्या असून सरस्वती यांनी त्यांच्या जीवन प्रवासाबाबत न्यूज 18 शी खास बातचीत केली.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 11 मार्च : खेळ हा, आपण राहत असलेल्या समाजाचा आणि आपण जगत असलेल्या जीवनाचा आरसा असतो. खेळांचं सौंदर्य असं आहे की, ते एखाद्या व्यक्तीला किंवा समुदायाला आखून दिलेल्या मर्यादा ओलांडण्यास मदत करू शकतात. बेंगळुरू येथील 42 वर्षीय पॉवरलिफ्टर सरस्वती आनंद यांच्या आयुष्यात खेळानं हीच भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या इजिप्तमधील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी 100 किलो वजन उचलून गोल्ड मेडल जिंकलं. "आंतरराष्ट्रीय महिला दिनी हा विजय मिळाला याचं मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत आहे," असं सरस्वती यांनी न्यूज 18शी बोलताना सांगितलं.

  मार्केटियर आणि नेटवर्क18मध्ये सहाय्यक उपाध्यक्ष असलेल्या सरस्वती म्हणाल्या, " भारतीय स्पर्धांमध्ये प्रामुख्याने भारतीयच भाग घेतात. विचार केला तर भारत हे क्रीडा राष्ट्र नाही. जोपर्यंत खेळाचा करिअर म्हणून विचार होत नाही तोपर्यंत आपण खेळामध्ये सक्रियपणे सहभागी होत नाही." 75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही राष्ट्राला भेडसावणाऱ्या काही समस्यांवर प्रकाश टाकताना सरस्वती यांनी स्पष्ट केलं की, भारतातील स्त्रिया लवकर खेळ सोडतात. वयाच्या 15 किंवा 16व्या वर्षांच्या आसपास मुलींना खेळ सोडताना त्यांनी पाहिले आहे. एकदा खेळणं सोडल्यानंतर मुली कधीही मैदानात परतत नाहीत.

  IND VS AUS : टीम इंडियाच्या अपेक्षांवर खरा उतरला शुभमन! ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकले दमदार शतक

  "म्हणून इजिप्तमधील स्पर्धा वेगळी होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे विविधता होती. इस्रायल, पॅलेस्टाईन सारख्या 10 देशांतील महिला स्पर्धक तिथे होत्या. त्यांना पॉवरलिफ्टिंगची आवड होती. विशेष म्हणजे पॉवरलिफ्टिंगला महिलांचा खेळ म्हणून बघितलं जात नाही. अगदी वयाच्या साठीमध्ये असलेल्या महिलादेखील स्पर्धेत उतरलेल्या होत्या आणि त्यांची नातवंड त्यांना प्रोत्साहन देत होती." जगभरातील लाखो लोकांसाठी लक्षवेधी ठरू शकणार्‍या या स्पर्धेबाबत बोलताना सरस्वती म्हणाल्या, "ही बाब तुम्हाला तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते."

  लेव्हल-अप :

  महिलांच्या खेळांचा विचार करता आणि उपखंडाचं वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक प्रतिबंधात्मक स्वरूप पाहता, आंतरराष्ट्रीय मंचावर लढा देण्यासाठी आणि लहानपणापासूनच आपल्या मुलींना क्रीडाक्षेत्रात ढकलणाऱ्या संस्कृतीतील महिलांच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी, मोठ्या प्रमाणात प्रयत्न आवश्यक आहेत.

  अशा परिस्थितीमधून कोणता धडा घेतला जाऊ शकतो याला स्पर्श करताना सरस्वती सांगतात, "खरं सांगायचं तर मी खूप घाबरले होते. कारण, पॉवरलिफ्टिंग ही मी करिअर म्हणून निवडलेली गोष्ट नाही. मी गेल्या दोन वर्षांत ती सुरू केली आहे. मी स्वत:ला अशा मैत्रिणींनी सान्निध्यात ठेवलं ज्यांनी मी स्वत:बद्दल कितीही नकारात्मक बोलले तरीही मला प्रोत्साहन दिलं. शिवाय, स्वत: एक वेटलिफ्टर असलेल्या माझ्या पतीनंही मला कायम पाठिंबा दिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे एक उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. मी नियमित जिममध्ये जाते, मी सायकल चालवते आणि स्वतःला शारीरिकरित्या सक्रिय ठेवते. जेणेकरून मी वजन उचलू शकेल."

  महामारीचा परिणाम :

  आपल्याला आवडो अथवा न आवडो साथीच्या रोगानं जग आणि लाखो लोकांचं जीवन बदललं. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत बदलाचे स्वरूप वेगळं आहे. महामारीनं जागतिक लोकसंख्येला शारिरीक आणि मानसिक बदलांना सामोरं जाण्यास भाग पाडलं. याच काळात सरस्वती यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये चमक दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी 2021 मध्ये भारतातील वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग काँग्रेसमध्ये विजय मिळवला आणि त्यानंतर 2022च्या जुलैमध्ये प्रो लीग इंडियन नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धा जिंकली.

  "मी दोन जुळ्या मुलींची आई आहे. जेव्हा माझ्या मुली मला स्पर्धा करताना बघतात किंवा मी स्वत:ला स्पर्धा करताना पाहते, तेव्हा माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि माझ्या व्यावसायिक जीवनात कोणत्या प्रकारची सकारात्मकता आली आहे, याची मला जाणीव होते." असं सरस्वती म्हणाल्या.

  केस, काळजी आणि प्रामाणिकपणा :

  सोशल मीडिया क्रांतीमुळे क्रीडापटूंची नावं घराघरात पोहोचली आहेत. त्यामुळे खेळाडूदेखील सेलिब्रिटी बनले आहेत. सेलिब्रेटीच्या दर्जाबरोबरच फॅशन आणि ग्लॅमरदेखील ओघानं आलं आहे. ढगळ आणि चमकदार कपडे, पिअरर्सिंग आणि विक्षिप्त केशरचना या गोष्टी खेळाडूंच्या फॅशन सेन्सचा भाग झाल्या आहेत. याबाबत बोलताना सरस्वती आनंद सांगतात, "माझे केस जरा लवकर पांढरे झाले होते म्हणून मी ते सतत कलर करायचे. यात माझा खूप वेळ जायचा. केसाचं आपण बरचं काही करू शकतो. पण, आता मला असं वाटतं की, वेगळं दिसण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची भर घालण्याची किंवा ‘तडका’ देण्याची गरज नाही. त्यामुळे आता मी पांढऱ्या केसांना रंगही लावत नाही आणि मेकअपही करत नाही."

  शारीरिक आणि मानसिक आरोग्य :

  खेळाचा जीवनावर काय परिणाम होतो, याचा प्रत्यक्ष अनुभव असलेली व्यक्ती म्हणून, सरस्वती यांना शारीरिक हालचाली अधिक महत्त्वाच्या वाटतात. त्या अशा प्रकारचे वातावरण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात जे आपल्या तरुण आणि लहान मुलांच्या आगामी पिढीसाठी योग्य ठरेल. "मला खेळाची खूप आवड आहे. केवळ माझ्या वैयक्तिक सोशल मीडिया हँडलवरच नाही, तर नेटवर्क18 सोबत काम करत असतानाही, जेव्हा मी एडिट टीमसोबत बसते तेव्हा आम्ही महिलांच्या खेळांबद्दल बोलतो आणि ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. विशेषत: बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल खेळादरम्यान, आपल्याकडे मीराबाई चानू, लवलीना, पी. व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंच्या विजयाच्या बातम्या देण्यात आल्या."

  खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांना मिळणाऱ्या पाठिंब्याच्या बाबतीत परिस्थिती किती त्रासदायक आहे याबाबत देखील सरस्वती यांनी आपलं मत व्यक्त केलं. मुलांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा मोठा अभाव आपल्याकडे आहे, असं त्या म्हणाल्या.

  First published:
  top videos

   Tags: Sports