Home /News /sport /

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध खेळण्यास दोघांचा नकार

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध खेळण्यास दोघांचा नकार

एका आठवड्याच्या कालावधीमध्येच दोन खेळाडूंनी इस्रायलचा ज्युडो खेळाडू टोहार बुटबुल (Tohar Butbul) याच्याविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे.

    सध्या टोकियोमध्ये समर ऑलिम्पिक (Tokyo Summer Olympics 2020) स्पर्धा सुरू आहेत. आधीच कोरोनामुळे उशिरा सुरू झालेल्या या स्पर्धांचं सुरळीतपणे आयोजन करणं हे जपानसमोरील मोठं आव्हान आहे. त्यातच, इस्रायल-पॅलेस्टाईनमधील राजकीय वादाचे (Palestine Israel conflict) पडसाद या खेळांदरम्यान दिसून लागले आहेत. एका आठवड्याच्या कालावधीमध्येच दोन खेळाडूंनी इस्रायलचा ज्युडो खेळाडू टोहार बुटबुल (Tohar Butbul) याच्याविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. गेल्या आठवड्यामध्ये अल्जेरियाचा खेळाडू फेथी नौरीनने (Fethi Nourine) 73 किलो वजनी गटातील ज्युडो सामन्यांमधून (Olympic Judo matches) माघार घेतली होती. इस्रायलच्या टोहारसोबत त्याची मॅच असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. इस्रायल-पॅलेस्टाईन राजकीय वादामध्ये पॅलेस्टाईनला पाठिंबा (Palestine support) देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे नौरीनने त्यानंतर स्पष्ट केले होते. नौरीन म्हणाला होता, “मी ऑलिम्पिकसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. याठिकाणी येणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, तसंच माझंही आहे. मात्र, पॅलेस्टाईनचा प्रश्न ऑलिम्पिकच्या तुलनेत खूप मोठा आहे. मी नेहमीच पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठामपणे उभा राहिलो आहे, आणि पुढेही राहीन. इस्रायल करत असलेल्या अत्याचारांविरोधात मी इथेही (ऑलिम्पिकमध्ये) बोलणार आहे. यामुळे मला ऑलिम्पिकमधून बाहेर काढलं तरीही चालेल. शेवटी देव सगळं पाहत आहे, आणि तो याची भरपाई नक्कीच करेल.” हे वाचा - विचित्र विकेटचं विचित्र सेलिब्रेशन, क्रिकेट मॅचचा असा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल! नौरीनने असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 साली टोकियोमध्येच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही (Tokyo world championship) टोहारविरद्ध होणाऱ्या सामन्यातून नौरीनने माघार घेतली होती. यानंतर आता ऑलिम्पिकमध्येही नौरीन आपल्या मतांवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने या प्रकरणाबाबत नौरीन आणि त्याच्या प्रशिक्षकाला निलंबित (Nourine suspended) केले आहे. यानंतर अल्जेरियाच्या ऑलिम्पिक समितीने त्यांना मायदेशी परत पाठवले आहे. गेल्या आठवड्यात नौरीनने सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर; आता या आठवड्यात सुदान देशाचा खेळाडू मोहम्मद अब्दुल रसूलनेही (Sudan Judo Player) टोहारविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. त्याने हा निर्णय का घेतला याबाबत मात्र अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे, राऊंड ऑफ 16 मध्ये टोहार बुटबुलचा सामना कॅनडाच्या आर्थर मार्गेलिडन याच्यासोबत झाला होता. मात्र, यात टोहारला पराभव स्वीकारावा लागला. राजकीय गोष्टींचे पडसाद या आधीही खेळांवर पडले आहेत. ऑलिंपिकमध्ये पडलेल्या या पडसादांमुळे इतर खेळाडूही कदाचित माघार घेऊ शकतात.
    First published:

    Tags: Japan, Olympic, Olympics 2021

    पुढील बातम्या