S M L

राष्ट्रपती कोविंद यांना पडला पंडित नेहरूंचा विसर !

पहिल्याच भाषणात त्यांनी सर्वधर्मसमभावापासून समान न्यायापर्यंत अनेक विषयांना हात घातला. पण देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही.

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2017 11:06 PM IST

राष्ट्रपती कोविंद यांना पडला पंडित नेहरूंचा विसर !

25 जुलै : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राम नाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सर्वधर्मसमभावापासून समान न्यायापर्यंत अनेक विषयांना हात घातला. पण देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही.

देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात कोविंद यांनी ज्या परिस्थितीतून आलो त्या मातीशी नाळ घट्ट असल्याचं सांगितलं. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, एपीजे अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या जवळपास 12 मिनिटांच्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींचा दोनदा उल्लेख केला. सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीनदयाळ उपाध्याय यांचंही नाव घेतलं. पण पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या नावाचा मात्र त्यांना विसर पडला.

देशात हिंदुत्ववादी शक्तींचं बळ वाढल्याची तक्रार आहे. दलित, अल्पसंख्याकांवर अत्याचाराच्या घटना घडतायत. त्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या विचारांचा सन्मान आणि सर्वांना समान न्यायाची गरज कोविंद यांनी व्यक्त केली.

प्राचीन परंपरा, संस्कृती आणि सर्वधर्मसमभाव यावर गर्व असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलंय. प्राचीन परंपरा आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालूनच देशाला प्रगतीपथावर नेता येत असल्याचं मत नव्या राष्ट्रपतींनी व्यक्त केलं.

कोविंद हे भाजपचे पहिले राष्ट्रपती...एकदा राष्ट्रपती भवनात गेल्यानंतर पक्षाशी संबंध संपतो...त्यामुळेच कोणत्याही विचारसरणीच्या पलीकडे जाऊन कोविंदही डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच राष्ट्रपतीपदाची आणि राष्ट्रपतीभवनाची प्रतिष्ठा वाढवतील, अशी आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 11:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close