भले शाब्बास, टाकाऊ प्लाॅस्टिकपासून तयार केला अर्ध्या किमीचा रस्ता !

भले शाब्बास, टाकाऊ प्लाॅस्टिकपासून तयार केला अर्ध्या किमीचा रस्ता !

विद्यापीठ परिसरात गोळा झालेल्या प्लाॅस्टिकचा वापर रस्ता बनवण्यासाठी करण्यात आलाय. डांबरात दहा टक्के प्लास्टिक मिसळून हा अर्ध्या किलोमीटरचा रस्ता बनवलाय.

  • Share this:

हरिश दिमोटे, अहमदनगर

24 मे : टाकाऊ प्लाॅस्टिकपासून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्लाॅस्टिकचा रस्ता बनवण्यात आलाय. प्लास्टिकमुक्तीचा हा मंत्र राज्यात राबवण्याची मागणी होतेय.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातला हा रस्ता... आता या रस्त्यात नवल ते काय म्हणाल तुम्ही... पण हा रस्ता बनलाय टाकाऊ प्लाॅस्टिकपासून....विद्यापीठ परिसरात गोळा झालेल्या प्लाॅस्टिकचा वापर रस्ता बनवण्यासाठी करण्यात आलाय. डांबरात दहा टक्के प्लास्टिक मिसळून हा अर्ध्या किलोमीटरचा रस्ता बनवलाय.

या उपक्रमामुळे प्लाॅस्टिकचा प्रश्न कायमचा निकाली निघालाय. विद्यापीठाच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय.

राज्यात अशाप्रकारचे प्रयोग यापूर्वीही झालेत. पण हा उपक्रम नुसता प्रयोगापुरता मर्यादित न ठेवता त्याचा व्यापक वापर करण्याची गरज निर्माण झालीये.

असा झाला रस्ता तयार

राज्यातील चारही कृषी विद्यापिठात प्लॅस्टिकचा रस्ता बनवण्याचा हा पहिलाचा प्रयोग आहे.  कुलगुरू डॉ. के. विश्वनाथा यांच्या संकल्पनेतून एक वर्षापासून विद्यापीठ परिसरात प्लॅस्टिक कचरा गोळा केला जात होता. आठवड्यातून एकदा कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लाॅस्टिक गोळा करण्याचा उपक्रम राबविला गोळा केलेले प्लाॅस्टिक कुंड्यांमध्ये साठवले.

राहुरी विद्यापीठाचा परिसर प्लाॅस्टिकमुक्त करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लाॅस्टिक गोळा केले. हे प्लाॅस्टिक १६० डिग्री तापमानावर वितळवून ते डांबरात मिसळण्यात आले. डांबरामध्ये मिसळणाऱ्या प्लाॅस्टिकचे प्रमाण १० टक्के ठेवण्यात आले आहे़ विद्यापीठाचे प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत या दरम्यान अर्धा किलोमीटर लांबीचा हा प्लास्टिक रस्ता साकारला गेलाय.

First published: May 24, 2017, 9:42 PM IST

ताज्या बातम्या