S M L

एका लग्नाची आदर्श गोष्ट, एकाच मांडवात दोन बहिणींशी विवाह

एकाच मांडवात दोन सख्या बहिणींसोबत केलेल्या लग्नाचे हे फोटो आणि लग्नाची पत्रिका सोशल मीडियातून तुमच्या मोबाईवर पोहोचली असेल.

Sachin Salve | Updated On: May 5, 2018 06:32 PM IST

एका लग्नाची आदर्श गोष्ट, एकाच मांडवात दोन बहिणींशी विवाह

नांदेड, 05 मे : एका मुलाचं एकाच मांडवात एकाच पत्रिकेवर दोन मुलींशी लग्न लागलं. तेही अगदी सगळ्यांच्या संमतीनं...सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीचं सत्य जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

एकाच मांडवात दोन सख्या बहिणींसोबत केलेल्या लग्नाचे हे फोटो आणि लग्नाची पत्रिका सोशल मीडियातून तुमच्या मोबाईवर पोहोचली असेल. त्यावर तुम्ही मस्करीनं काही लिहिलंही असेल. पण त्या अनोख्या लग्नाची खरी गोष्ट ऐकल्यावर एकाच मांडवात दोन बायकांची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या साईनाथचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. त्याचं झालं असं, साईनाथ राजश्रीला पाहायला गेला. त्याला ती आवडली. पण राजश्रीनं त्याच्यापुढे एक अजब अट ठेवली...अट होती मोठी बहीण धुरपतासोबतही लग्न करण्याची...


धुरपता जन्मापासूनच गतीमंद आहे. कायम आजारी असते. तिचं लग्नही होत नाही. आई-वडिलांना मुलगा नाही. होती ती सगळी शेतीही तिला बरं करण्यासाठी घालवली. त्यामुळे गतीमंद बहिणीसोबत आपल्या होणाऱ्या नवऱ्यानं लग्न करावं ही राजश्रीची अट साईनाथनंही मान्य केली. बहिणीच्या भविष्यही मंगल व्हावं म्हणून स्वता:हून घरात सवत आणली.

राजश्रीनं घेतलेला निर्णय सग्यासोयऱ्यांनीही स्विकारला. पण त्यांना समाजाच्या नैतिकतेची भीती वाटतीय.

कायद्याच्या आणि तथाकथिक नैतिकतेच्या चौकटीत भलेही हे लग्न बसत नसेल पण शाळेची चार अक्षरं न शिकलेल्या...या माणसांनी परिस्थितीवर शोधलेला मार्ग कायदा आणि नैतिकतेच्या खूप पलिकडचा आहे हे आपण समजून घ्यायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2018 06:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close