जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / एकही क्षत्रिय ठेवणार नाही..! 21 वेळा पृथ्वी क्षत्रियहीन करणाऱ्या परशुरामाचा क्रोध असा झाला शांत

एकही क्षत्रिय ठेवणार नाही..! 21 वेळा पृथ्वी क्षत्रियहीन करणाऱ्या परशुरामाचा क्रोध असा झाला शांत

परशुराम जयंती 2023 कथा

परशुराम जयंती 2023 कथा

आज भगवान परशुराम यांची जयंती. ते उग्र स्वभावाचे ऋषी म्हणून ओळखले जातात. त्यांचा क्षत्रियांवर इतका राग होता की, त्यांनी एकही क्षत्रिय पृथ्वीवर जिवंत न ठेवण्याची शपथ घेतली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 एप्रिल : भारतीय ऋषी आणि गुरूंच्या परंपरेत परशुरामाचा उल्लेख निश्चितपणे आढळतो. आज भगवान परशुराम यांची जयंती. ते उग्र स्वभावाचे ऋषी म्हणून ओळखले जातात. त्यांचा क्षत्रियांवर इतका राग होता की, त्यांनी एकही क्षत्रिय पृथ्वीवर जिवंत न ठेवण्याची शपथ घेतली होती. परशुरामांच्या अनेक कथा आहेत. त्यांच्याशी संबंधित एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की, त्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी आईची हत्या केली होती. यामागचे कारण काय होते? परशुरामाची एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना अमरत्वाचे वरदान मिळाले होते. रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये त्यांनी आपला प्रभाव दाखवला. म्हणूनच त्यांच्या जीवनातील काही कथा महाभारताशी संबंधित आहेत तर काही रामायणाशी संबंधित आहेत. आश्चर्यकारक होती ती घटना - परशुरामाने आपल्या आईची हत्या का केली? ही घटनाही आश्चर्यचकित करणारी आहे. त्यांनी आपल्या मनाने हे अजिबात केलं नाही. मात्र, परशुरामने आईची हत्या केल्यावर वडिलांसह सर्वजण अवाक झाले. मग त्यांनी आणखी एक गोष्ट केली ज्यामुळे हे आश्चर्य आणखी वाढले. वडील आईवर रागावले होते - परशुरामची आई रेणुका पाण्याचा कलश घेऊन नदीवर गेली होती. कलशात पाणी भरून त्या परत येणार होत्या. गंधर्व चित्ररथ नदीत अप्सरांसोबत जलक्रीडा करत होते. रेणुका त्याला बघण्यात इतकी तल्लीन झाली की तिला पाणी घेऊन परत यायला उशीर झाला. तिकडे तिचे पती जमदग्नी ऋषी यज्ञासाठी बसले होते. विलंबामुळे त्यांना यज्ञ करता आला नाही. परशुरामने आईचा शिरच्छेद केला - रेणुका पाणी घेऊन परत आल्यावर परशुरामाचे वडील रागाने लाल-पिवळे झाले होते. ती येताच जमदग्नी ऋषी रागाने गर्जना करू लागले. त्यांनी लगेचच आपल्या चार मुलांना त्यांच्या आईचा वध करायला सांगितले. हे तिन्ही पुत्रांनी ऐकले पण ते मान खाली घालून उभे राहिले. पण, परशुरामाने तसं केलं नाही, पित्याची सूचना ऐकली आणि स्वत:च्या आईवर कुऱ्हाड उचलली आमि एका झटक्यात आईचे डोके धडापासून वेगळे केले. सर्वजण स्तब्ध झाले - परशुरामाने हे कृत्य केल्याने सर्वजण थक्क झाले. त्याच्या वडिलांना अशी अपेक्षा नव्हती की, परशुराम आपली आज्ञा पाळण्यासाठी इतका पुढे जाईल. एकीकडे पत्नीच्या हत्येने तो दु:खी होता तर दुसरीकडे आपला मुलगा आपली किती आज्ञा पाळतो हे पाहून त्यांना आनंद होत होता. त्याने परशुरामाला वरदान मागायला सांगितले. परशुरामने लगेच वडिलांना चार वरदान मागितले. - आई पुन्हा जिवंत व्हायला हवी. - आपली हत्या झाल्याचे तिला आठवत कामा नाही. - आपले सर्व भाऊ स्तब्ध अवस्थेतून सामान्य व्हायला हवे. या वरदानांसोबतच वडील ऋषी जमदग्नी यांनीही त्यांना अमर होण्याचे वरदान दिले. कर्ण हा परशुराम ऋषींचा शिष्य होता. त्यांच्याकडूनच तो शस्त्रास्त्र शिकला. पुढे तोही ऋषींच्या क्रोधाचा बळी झाला, कारण परशुरामाला वाटले की तो क्षत्रिय आहे.

News18लोकमत
News18लोकमत

म्हणून क्षत्रियांचा राग - महर्षी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र परशुराम हे ब्राह्मण असूनही त्यांच्यात कृतीने क्षत्रिय गुण होते. एके दिवशी परशुराम बाहेर गेले असता, राजा सहस्रबाहू हैहयराज यांचे दोन्ही पुत्र कृतवीर अर्जुन आणि कार्तवीर्य अर्जुन त्यांच्या कुटीवर आले. त्यांनी राजाने दान केलेल्या गायी आणि वासरे जबरदस्तीने काढून घेतली. तसेच आईचा अपमानही केला. परशुरामाला कळताच त्यांनी रागाने राज सहस्रबाहू हैहयराजाचा वध केला. परिणामी त्यांच्या दोन्ही मुलांनी पुन्हा आश्रमावर हल्ला केला. तेव्हा परशुराम तिथे नव्हते. त्यांनी मुनी जमदग्नींचा वध केला. परशुराम घरी पोहोचल्यावर त्यांना ही गोष्ट कळली. रागानं क्रोधित झालेल्या परशुरामांनी पृथ्वीला क्षत्रियहीन करीन, अशी शपथ त्याच वेळी घेतली. या रागापायी परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा वध केला. हे वाचा -  अक्षय्य तृतियेला लागून आलीय विनायक चतुर्थी; पहा पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि शुभ योग रागीट स्वभाव - दुर्वासाप्रमाणेच परशुरामही त्यांच्या रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध होते. 21 वेळा त्यांनी पृथ्वीला क्षत्रियरहित केले. प्रत्येक वेळी हताहत क्षत्रियांच्या बायका वाचल्या आणि नवीन पिढीला जन्म दिला. प्रत्येक वेळी क्षत्रियांचा वध केल्यावर ते कुरुक्षेत्रातील पाच तलाव रक्ताने भरत असत. शेवटी पितरांचा आकाशवाणी ऐकून त्यांनी क्षत्रियांशी युद्ध करणे थांबवले आणि तपश्चर्येवर लक्ष केंद्रित केले. श्रीरामावरही संतापले होते - सीतेच्या स्वयंवरात श्रीरामाने शिवधनुष्य तोडल्याचा आवाज ऐकून परशुरामाची तपश्चर्या भंग झाली होती. ते प्रचंड रागावून स्वयंवराच्या ठिकाणी आले. पण श्रीरामाला भेटल्यावर ते विष्णूचा अवतार असल्याचे समजले. म्हणूनच त्यांची पूजा करून तपश्चर्येसाठी परतले. हे वाचा -  यंदाची अक्षय्य तृतिया जीवनात आणेल राजयोग; पूजेला बसल्यावर ही गोष्ट नक्की करा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात