मुंबई, 22 एप्रिल : धार्मिक शास्त्रांमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या देवी-देवतांना अतिशय प्रिय आहेत. त्यापैकी काही फुलेही आहेत, ती देवतांना अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. देवी दुर्गेला जास्वंदाची फुले खूप आवडतात, त्याचप्रमाणे धतुर्याचे फूल भगवान शंकराला अर्पण केले जाते. शंकराला धतुऱ्याचे फूल खूप आवडते, असे मानले जाते. जाणून घेऊया या फुलाची खासियत काय आणि भोलेनाथला ते का आवडते. भोलेनाथाला धतुर्याचे फूल का प्रिय - महादेवाला धतुर्याचे फूल अर्पण केलं नाही तर त्यांची पूजा पूर्ण होत नाही, असे मानले जाते. या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कुठेही उगवते. त्याच्यासाठी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नसते. मात्र, धतुऱ्याची फुले विषारी असल्यानं ती खाण्याची चूक करू नये. ज्योतिषशास्त्रात या फुलाला खूप महत्त्व आहे. वास्तविक या फुलाचा रंग पांढरा आहे, जो भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. पण, या फुलामध्ये कसलाही सुगंध नसतो. धतुर्याची फुले अतिशय नाजूक असतात, म्हणून तोडल्यानंतर लगेच अर्पण करा, नाहीतर कोमेजून जातात.
शंकराला हे फूल आवडण्याचे कारण म्हणजे या फुलाचा इतरत्र खूप तिरस्कार केला जातो. भगवान शिव ज्यांना समाजाने नाकारले त्यांचा स्वीकार करतात. त्यांचा हा स्वभाव उदारता दर्शवतो. हे वाचा - लक्ष्मी कृपेचा वर्षाव! अक्षय्य तृतीयेला राशीनुसार सोने किंवा हे धातू खरेदी करा त्याचबरोबर मनातील कटुता दूर करण्यासाठी आणि चांगल्या विचारांचा संचार करण्यासाठी हे फूल भगवान शंकराला अर्पण करण्यामागे एक कारण मानले जाते. यासह इतर कारणांमुळे हे फूल भगवान शंकराला अर्पण केलं जातं. हे वाचा - अमावस्येची काळीरात्र यांच्यासाठी जणू दिवाळी; जळणाऱ्या चितेवर केले तांत्रिक विधी (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







