'कालों के काल महाकाल' च्या या भूमित आणि देवी क्षिप्रा नदीच्या काठावरील स्मशानभूमीत तंत्र साधनेला वेगळंच महत्त्व आहे. उज्जैनच्या स्मशानभूमीत जळणाऱ्या चितांवर तांत्रिक तंत्र-साधना करतात आणि हे लोक वेगवेगळ्या राज्यांमधून येथे एकत्र येऊन आणि अदृश्य शक्तींसाठी आराधना करतात.
चैत्र अमावास्येच्या काळ्या रात्री उज्जैनच्या चक्रतीर्थ स्मशानभूमीमध्ये एका जळत्या चितेच्या भोवती तांत्रिकांची जणू जत्रा भरली होती. अमावास्या आणि ग्रहण हे दोन्ही काल एकत्र आल्याने तंत्र-मंत्रांवर विश्वास असणारे क्षिप्रा नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत मोठ्या संख्येने जमले होते.
धार्मिक मान्यतेनुसार, देशातील सर्वात जागृत स्मशानभूमींमध्ये उज्जैनची चक्रतीर्थ स्मशानभूमी समाविष्ट आहे. म्हणूनच, काही विशिष्ट दिवशी तंत्र-क्रिया करण्यासाठी दूरदूरवरून तांत्रिक येथे पोहोचतात. मध्यरात्री तांत्रिकांनी येथे तंत्र-मंत्र साधना केली. यावेळी, जळत्या चितेवर मृत शरीरासह, इतर तांत्रिक क्रिया देखील केल्या गेल्या.
उज्जैनमध्ये तंत्र साधनेसाठी अमावस्या-ग्रहणाचे दिवस विशेष महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. तंत्र-मंत्र क्रियेदरम्यान, मद्य, लिंबू, मिठाई, मावा, फळे, कुंकू, माचिस, फुले, दिवे यासह इतर वस्तू वापरल्या जातात. मध्यरात्री येथील विधी सुरू होतात आणि सुमारे दीड ते दोन तास चालतात.
या क्रिया-साधना वेगवेगळ्या हेतूने केल्या जातात. ज्याची भिन्न कारणे असू शकतात. यात तंत्र, मंत्र, यंत्र, कलवा साधना, वीरसाधना, यक्षिन साधना, वीरभट्ट, वेताळ साधना आणि शवसाधना यांचा समावेश आहे.
आसाम, गुजरात, महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशातील विविध भागातील तांत्रिक शक्तींवर विश्वास असलेले लोक उज्जैनमधील क्षिप्रा नदीच्या तिरावरील स्मशानभूमीत दाखल झाले होते.
ग्रहण, दीपावली, सोमवती अमावस्या यासारख्या दिवसांमध्ये तांत्रिक क्रिया आणि विशेष विधी करतात. कालच्या चैत्र अमावस्येला रात्रीच्या अंधारात अघोरी-तांत्रिक क्रिया स्मशानभूमीत पार पडल्या.