शक्ति सिंह, प्रतिनिधी कोटा, 11 मे : राजस्थानच्या कोटामधील दादाबादी येथील नसिया जी जैन मंदिरात असलेल्या आदिनाथाच्या मूर्तीची सध्या जैन समाजातील लोकांमध्ये चर्चा आहे. येथे येणारे भाविकांनी दावा केला आहे की, भगवान आदिनाथांच्या मूर्तीतून पाण्याचा प्रवाह येत आहे. तर आजूबाजूला पाणी नाहीए. पण मंदिरात येणारे भाविक हा चमत्कार मानत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दररोज प्रमाणे येथेही शेकडो भाविक अभिषेक पूजा करण्यासाठी येतात. मंदिरात उपस्थित भाविक छोटी शांतीधारा करत असताना अचानक तिथल्या भगवान आदिनाथांच्या मूर्तीतून पाण्याचा प्रवाह येऊ लागला. हे दृश्य काही मिनिटांसाठीच भाविकांनी पाहिले. प्रवाह बाहेर आला आणि अदृश्य झाला. तिथे पाणी दिसत नव्हते. मंदिरात उपस्थित असलेल्या अनेक भाविकांनी या दृश्याचा व्हिडिओ बनवला आहे.
भाविकांनी बनवला व्हिडिओ - मंदिरात उपस्थित अर्चना जैन यांनी सांगितले की, त्या दररोज पूजा करण्यासाठी येतात. गेल्या 3 दिवसांपासून पाण्याचा प्रवाह काही मिनिटे परमेश्वराच्या चरणाजवळून वाहत होता आणि काही वेळाने तोही ओसरला. अर्चना जैन यांनी देवाचा हा अभिषेक आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. पाण्याच्या प्रवाहाचा व्हिडिओही बनवला. यावेळी मंदिरात उपस्थित सर्व भाविकांनी देवाची स्तुती सुरू केली. देवाचा अभिषेक देवच करत असल्याचे भक्त सांगतात. हे पाहण्याची संधी आम्हाला मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
अर्चना जैन यांनी सांगितले की, सुधा सागर जी महाराज यांनी 2015 च्या चातुर्मासात सांगितले होते की बडे बाबांच्या मूर्तीमध्ये खूप ऊर्जा आहे आणि एक ना एक दिवस देश-विदेशातील नाहीतर तर थेट देवता त्यांना भेटायला येतील आणि जलाभिषेक करतील. 8 वर्षांनंतर गेल्या 3 दिवसांपासून ही गोष्ट खरी ठरत आहे, असे भाविकांना वाटत आहे.