मराठी बातम्या /बातम्या /religion /

Festival in December 2022 : डिसेंबर महिन्यातील प्रमुख सण-उपवास, तारखा आणि शुभ वेळा जाणून घ्या

Festival in December 2022 : डिसेंबर महिन्यातील प्रमुख सण-उपवास, तारखा आणि शुभ वेळा जाणून घ्या

डिसेंबर महिन्यातील धार्मिक सण-उपवास

डिसेंबर महिन्यातील धार्मिक सण-उपवास

डिसेंबर महिन्यामध्ये अनेक प्रमुख व्रत-उपवास होणार आहेत. यासोबतच बुध, शुक्र आणि सूर्य या तीन ग्रहांची राशीही बदलणार आहे. डिसेंबर महिन्यात अनेक उपवास सण येत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 02 डिसेंबर : सध्या वर्ष 2022 चा शेवटचा महिना सुरू आहे. डिसेंबर महिन्यामध्ये अनेक प्रमुख व्रत-उपवास होणार आहेत. यासोबतच बुध, शुक्र आणि सूर्य या तीन ग्रहांची राशीही बदलणार आहे. डिसेंबर महिन्यात अनेक उपवास सण येत आहेत, त्यापैकी प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री, एकादशी, आणि ख्रिसमस इ. महत्त्वाचे दिवस आहेत. जाणून घेऊया डिसेंबर महिन्यामधील प्रमुख उपवास सण आणि त्यांचे महत्त्व...

गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी (3 डिसेंबर, शनिवार)

मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती हा सण मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो. व्रत-उपवास केल्यानं सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. शास्त्रानुसार गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी एकाच दिवशी असल्याने या तिथीची तुलना मणिचिंतामणीशी केली जाते.

दत्तात्रेय जयंती (7 डिसेंबर, बुधवार)

दत्तात्रेय जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी केली जाईल आणि यावेळी ही शुभ तिथी बुधवार, 7 डिसेंबर रोजी आहे. महायोगीश्‍वर दत्तात्रेय हे ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे अवतार मानले जातात आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला आणि 24 गुरूंकडून त्यांनी शिक्षण घेतले. भगवान दत्तात्रेयांच्या नावाने दत्त संप्रदायाचा जन्म झाला. दक्षिण भारतात भगवान दत्तात्रेयांची अनेक मंदिरे आहेत.

सफला एकादशी (19 डिसेंबर, सोमवार)

मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी साजरी केली जाते आणि ती वर्षातील शेवटची एकादशी देखील आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान आणि ध्यान करून व्रत करण्याचा संकल्प केला जातो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते. शास्त्रानुसार सफला एकादशीचे व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मोक्ष प्राप्त होतो.

हे वाचा - पितळेच्या भांड्याचा हा एक उपाय नशीब बदलेल; पूजेशिवाय असा करा उपयोग

ख्रिसमस डे (25 डिसेंबर, रविवार)

भारतासह जगभरात 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस डे साजरा केला जातो. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात मोठा सण आहे, या सणाची अनेक दिवसांपासून तयारी केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. आजही त्यांच्या जन्मतारखेबाबत अनेक प्रश्न आहेत. परंतु ही तारीख रोमन साम्राज्याचा पहिला ख्रिश्चन सम्राट कॉन्स्टंटाईनच्या काळात ओळखली गेली. त्यानंतर पोप सेक्सटस ज्युलियस आफ्रिकनस यांनी 25 डिसेंबर रोजी लोकप्रिय मेजवानी साजरी केली. तेव्हापासून येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

वाचा - 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?

याशिवाय 5 तारखेला सोमप्रदोष व्रत आहे. 8 तारखेला गुरुवारी पौर्णिमा आहे. 11 तारखेला संकष्ट चतुर्थी असून चंद्रोदय रात्री 8.40 वाजता आहे. तसेच 23 तारखेला शुक्रवारी दुपारी 3.47 वाजेपर्यंत दर्श वेळा अमावस्या आहे.

First published:

Tags: Lifestyle, Religion