मराठी बातम्या /बातम्या /religion /

Agni Panchak : 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?

Agni Panchak : 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?

पंचकाचे प्रकार

पंचकाचे प्रकार

Agni Panchak : मंगळवारपासून 'अग्नी पंचक' सुरू झाले आहे. आज आपण जाणून घेऊया 'पंचक'चे किती प्रकार आहेत आणि त्यांचा प्रभाव कसा असतो? यासोबतच कोणत्या ग्रह किंवा नक्षत्रांच्या संयोगाने पंचक तयार होते हे देखील पाहुया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची परंपरा आहे. यामध्ये अंतराळातील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहून गणना केली जाते. यानंतर शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त ठरवला जातो. चांगल्या मुहूर्तावर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केल्यास यशाची शक्यता वाढते, अशी लोकांची धारणा आहे. याउलट असं मानलं जातं की, अशुभ काळात नवीन कामं सुरू केली तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

मंगळवारी म्हणजेच 29 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7:51 पासून अशा नक्षत्रांचा संयोग तयार झाला आहे, ज्याला पंचक म्हणतात. अशा परिस्थितीत पुढील 5 दिवस कोणतेही मंगल किंवा शुभ कार्य सुरू न करण्याचा सल्ला दिला जातो. मंगळवारपासून 'अग्नी पंचक' सुरू झाले आहे. आज आपण जाणून घेऊया 'पंचक'चे किती प्रकार आहेत आणि त्यांचा प्रभाव कसा असतो? यासोबतच कोणत्या ग्रह किंवा नक्षत्रांच्या संयोगाने पंचक तयार होते हे देखील पाहुया.

'पंचक' कधी आणि कसे सुरू होते -

धनिष्ठ, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद, रेवती आणि शतभिषा नक्षत्रांवरून चंद्र भ्रमण करतो तेव्हा पंचक काल तयार होतो. देशाच्या काही भागात या स्थितीला 'भदवा' असेही म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीतून जातो तेव्हाच पंचक होते. पंचकाचे परिणाम थेट सुरुवातीच्या दिवसाशी संबंधित आहेत. त्याआधारे त्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आता जाणून घेऊया की चोरापासून रोगापर्यंत पंचकांचे किती प्रकार आहेत?

मंगळवारी असेल तर 'अग्नी पंचक'

सर्वप्रथम मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पंचकाविषयी जाणून घेऊया. वास्तविक मंगळवारी 'पंचक' सुरू झाले तर त्याला 'अग्नी पंचक' म्हणतात. या 5 दिवसांत न्यायालयाच्या निर्णयांवर आणि विवादांवर अधिकार मिळवण्याचे काम करता येईल. असे मानले जाते की अग्नि पंचकमध्ये बांधकाम किंवा यंत्राशी संबंधित काम सुरू करणे अशुभ मानले जाते.

'अग्नि पंचक'मध्ये मंगळ ग्रहाशी संबंधित गोष्टी अतिशय काळजीपूर्वक वापराव्यात. तसेच यावेळी आग टाळावी. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट म्हणतात की अग्निपंचक सुरू झाल्यापासून नवीन गॅस स्टोव्ह वापरणे सुरू करू नये. याशिवाय या काळात हवन आणि यज्ञ करण्यासही मनाई आहे.

बुधवारी 'पंचक' सुरू झाले, तर?

सर्व पंचक अशुभ फळ देत नाहीत. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, असे काही पंचक आहेत ज्यात मंगल आणि शुभ कार्ये करण्यास मनाई नाही. असे मानले जाते की बुधवार आणि गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पंचकमध्ये सर्व प्रकारची शुभ कार्ये होऊ शकतात. या 5 दिवसात साखरपुडा, विवाह यांसारखी शुभ कार्येही करता येतील.

'चोर पंचक' शुक्रवारी येते -

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकाला 'चोर पंचक' म्हणतात. चोर पंचकामध्ये पैशाचे किंवा मालमत्तेचे व्यवहार आणि व्यवसाय सुरू करणे टाळावे, असे मानले जाते.

शनिवारपासून 'मृत्यू पंचक'

पंचकांमधील 'मृत्यू पंचक' मध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकाला 'मृत्यू पंचक' म्हणतात. 'मृत्यू पंचक' दरम्यान राग टाळावा आणि वाणीत गोडवा आणावा असा सल्ला ज्योतिषशास्त्र देते.

रोग पंचक रविवारी

ज्या पंचकमध्ये कोणतेही मंगल किंवा शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो, रविवारपासून 'रोग पंचक' सुरू होतो. या दरम्यान 5 दिवस शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. हे पंचक सर्व प्रकारच्या मंगल आणि शुभ कार्यांसाठी अशुभ मानले जाते.

हे वाचा -  आजपासून सुरू झालं अग्नीपंचक; चुकूनही अशी कामं नका करू, आयुष्यभर कराल पश्चाताप

'राज पंचक' शुभ

शुभ पंचकमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या 'राज पंचक'चाही समावेश आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, याच्या प्रभावामुळे 5 दिवसात शासकीय किंवा सरकारी कार्यालयांशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता खूप वाढते. एवढेच नाही तर प्रॉपर्टीशी संबंधित काम केले तरी यश मिळू शकते.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu