मुंबई, 02 जून : आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चवीसाठी, आरोग्यासाठी तसेच ज्योतिषीय उपायांसाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या वापराने आर्थिक समस्या, नोकरीतील अडथळे किंवा घरातील गरिबी दूर होऊ शकते. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली हळद मानवी आरोग्यासाठी तर अतिशय फायदेशीर आहेच पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रातही हळदीचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. धार्मिक कार्यातही हळदीचा वापर शुभ मानला जातो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा हळदीशी संबंधित अशा काही वास्तु टिप्स सांगत आहेत, ज्यामुळे तुमच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. 1. अडकलेले पैसे परत मिळतील - जर एखाद्या व्यक्तीचा पैसा कुठेतरी अडकला असेल आणि परत मिळत नसेल तर वास्तुशास्त्रानुसार, तांदळाचे काही दाणे हळदीमध्ये मिसळा. हे पिवळ्या रंगाचे तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा. या उपायाने पैशाचा ओघ तर वाढेलच पण तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील. 2. बदलेल आर्थिक स्थिती - वास्तुशास्त्रानुसार, जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल आणि ती लवकर बदलायची असेल तर घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडावे. हळदीच्या पाण्यात 1 रुपयाचे नाणे बुडवून त्याने पाणी शिंपडल्यास अधिक फायदा होईल. या उपायाने घरातील दारिद्र्य दूर होईल आणि सुख-समृद्धीही येईल.
3. सुख आणि समृद्धीसाठी उपाय - गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णूला हळद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. या उपायाने केवळ आर्थिक अडचणी दूर होत नाहीत तर घरात सुख-समृद्धीही वाढते. पहिल्यांदाच वट सावित्रीची पूजा करणार आहात? सुहासिनींनी या गोष्टी लक्षात ठेवा 4. थांबलेल्या कामाला गती मिळेल वास्तुशास्त्रानुसार, जर तुमची कामे खूप दिवसांपासून थांबलेली असतील आणि तुम्हाला ती पूर्ण करायची असतील तर, पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे बेसन लाडू, सुपारी, हळद, पिवळ्या रंगाचे कपडे गरीब आणि गरजू लोकांना गुरुवारी दान करणे अत्यंत लाभदायक आहे. या उपायाने तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. 5. विवाहात येणारे अडथळे दूर होतील ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा येत आहे त्यांनी नियमितपणे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला चिमूटभर हळद अर्पण करावी. या उपायाने लक्ष्मीनारायण प्रसन्न होतात आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात, तसेच वैवाहिक जीवन आनंदात जाते. नवरा-बायकोच्या नात्यावर होईल परिणाम, वटपौर्णिमेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







