जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vastu: घराच्या प्रवेशद्वाराशी का ठेवावं पाण्यानं भरलेलं भांडं? वास्तुशास्त्रानुसार असा होतो फायदा

Vastu: घराच्या प्रवेशद्वाराशी का ठेवावं पाण्यानं भरलेलं भांडं? वास्तुशास्त्रानुसार असा होतो फायदा

मराठी वास्तुशास्त्र टिप्स

मराठी वास्तुशास्त्र टिप्स

Vastu tips in Marathi : वास्तुशास्त्रानुसार, पाण्याला घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करणारा स्रोत मानले जाते. यासाठी घराच्या मुख्य दारात पाण्याने भरलेले भांडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 जुलै : घरातील सुख-समृद्धीसाठी आपण सगळेच मेहनत करत असतो. पण, काही ना काही अडचणी येत राहतात. आजारपण, वाद-विवाद यामुळे घराती सुख-शांती नाहीशी होते. घरातील विविध अडचणींवर वास्तुशास्त्रात उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या प्रवेशद्वारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. असं मानलं जातं की, जी व्यक्ती घराबाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवते त्याला जीवनात चांगलं यश मिळतं. या वास्तू उपायाविषयी ज्योतिषाचार्य पंडित ऋषिकांत मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊ. नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल - पाण्याला केवळ शास्त्रोक्तच नव्हे, तर वास्तुशास्त्रातही महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, पाण्याला घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करणारा स्रोत मानले जाते. यासाठी घराच्या मुख्य दारात पाण्याने भरलेले भांडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने वाईट शक्ती मुख्य दरवाजाच्या आत येण्यापासून रोखते आणि घरातील लोकांचे दुर्भाग्यापासून संरक्षण होते. याशिवाय इतर अनेक अडचणींपासून तुमचे जीवन वाचवण्यास मदत होऊ शकते. हा उपाय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

News18लोकमत
News18लोकमत

चांगले वातावरण राहण्यास होते मदत - वातावरण मंगलमय होण्यासाठी घराच्या प्रवेशद्नारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवू शकता. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचाही हा एक उत्तम पर्याय असू शकतो. पाण्यानं भरलेलं भांड दारात असणं घरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांना चांगले दर्शन देते आणि पाहुणचाराचे प्रतीक मानले जाते. बजरंगबलीवरून तुमच्या बाळासाठी ही नावे ठेवू शकता; हनुमान चालिसेत आहे उल्लेख पाणी भरलेले भांडे ठेवण्याचे वास्तू नियम - 1. पाणी भरून ठेवण्याचे हे भांडे तांबे किंवा पितळ यासारख्या वास्तुशास्त्र अनुकूल धातूचे बनलेले असावे. 2. भांड्यातील पाणी नियमितपणे बदलले पाहिजे आणि भांडे देखील पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे. 3. दारात पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घ्या. 4. हे भांडं एखाद्या टेबलावर किंवा कशावर तरी थोड्या उंचावर ठेवणे अधिक योग्य असेल, जेणेकरून ते पाहुण्यांना सहज दिसेलही. 5. घराच्या दारात पाण्याचे भांडे ठेवण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की ते थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेजवळ ठेवणं टाळा. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात