जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / नोकरी-धंद्याचं बस्तान बसेल अगदी सेट; गाईची अशी प्रतिमा लावण्याचा होतो फायदा

नोकरी-धंद्याचं बस्तान बसेल अगदी सेट; गाईची अशी प्रतिमा लावण्याचा होतो फायदा

गाईची मूर्ती

गाईची मूर्ती

कामधेनू गाईची मूर्ती/ फोटो ठेवल्याने घर, कामाच्या ठिकाणचे वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते, असे मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया कामधेनू गाईची मूर्ती/फोटो कुठे कसा लावायचा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 मे : वास्तुशास्त्र जीवनात खूप महत्त्वाचे मानले जाते. वास्तूनुसार घर खरेदी करण्यापासून ते घरात वस्तू व्यवस्थित ठेवण्यापर्यंत अनेक नियम आहेत. वास्तू नियमांनुसार वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवल्या तर जीवनात सुख-समृद्धी मिळू शकते. वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती घरी किंवा कामाच्या ठिकाणी ठेवणं शुभ मानलं जातं. कामधेनू गाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानं घरात सुख-समृद्धी नांदते. कामात प्रगती, धंद्यात चांगला नफा मिळतो, असे मानले जाते. कामधेनू गाईची मूर्ती/ फोटो ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते, असे मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया कामधेनू गाईची मूर्ती कशी बसवायची. कामधेनू गाईची मूर्ती अशा प्रकारे घरात ठेवा -

News18लोकमत
News18लोकमत

योग्य दिशेला असणे आवश्यक - कामधेनू गाईची मूर्ती वास्तु नियमानुसार योग्य दिशेला ठेवावी. वास्तूनुसार कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला कामधेनू गाईची मूर्ती स्थापित केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सुख-शांती नांदते. गिफ्ट म्हणून मिळालेल्या या वस्तू घरात ठेवू नये; अडचणी-संकटांचे बनू शकतात कारण या ठिकाणी मूर्ती ठेवा -

News18

कामधेनू गायीला वैश्विक गाय असेही म्हणतात. कामधेनू गाय ज्या घरात बांधली जाते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते, असे म्हणतात. हिंदू धर्मात कामधेनूची मूर्ती आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवावी. ही मूर्ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही ठेवू शकता. यामुळे घरात सुख-शांती राहील. Vastu: सुखी कुंटुबाची येईल प्रचिती! या वास्तु उपायांनी कुटुंब राहतं हसतं-खेळतं या प्रकारची मूर्ती घरात ठेवा - वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती कोणत्याही धातूमध्ये बसवता येते. घरामध्ये सोन्याची किंवा चांदीची मूर्ती बसवलीच पाहिजे असे नाही. हवी असल्यास तांब्याची किंवा पितळी मूर्तीही ठेवू शकता किंवा सामान्य कामधेनूचे चित्रही लावू शकता. बुधादित्य योगात या 5 राशीच्या लोकांचं नशीब राहील जोमात; कामांचा लागेल धडाका (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात