जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Jalna News : लक्ष्मीला आवडतात ही 7 रोपे, घरात लावा होईल आर्थिक फायदा Video

Jalna News : लक्ष्मीला आवडतात ही 7 रोपे, घरात लावा होईल आर्थिक फायदा Video

Jalna News : लक्ष्मीला आवडतात ही 7 रोपे, घरात लावा होईल आर्थिक फायदा Video

ही रोपे आपल्या अंगणात किंवा घराच्या गॅलरीत लावल्यास आपल्या घरी धनसंपदा आणि समृद्धी येवू शकते.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

जालना, 13 जुलै : आपल्या देशात देवी देवतांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अनेक लोक भारतीय ग्रंथ आणि धर्म परंपरा जपत असतात. या अनेक देवता पैकी धनाची देवता म्हणजेच महालक्ष्मी. महालक्ष्मीला देखील खूप महत्व आपल्या शास्त्रामध्ये आहे. त्यामुळे महालक्ष्मीला कोणते रोपे आवडतात? ही रोपे आपल्या अंगणात किंवा घराच्या गॅलरीत लावल्यास आपल्या घरी धनसंपदा आणि समृद्धी येवू शकते का याबद्दल जालन्यातील  पुरोहित विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी माहिती दिली आहे. कोणती रोपे लावावी? 1) कमळ  धर्मामध्ये धर्म, अर्थ काम आणि मोक्ष यांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यापैकी अर्थाची प्राप्ती करण्यासाठी आपण लक्ष्मीची उपसाना केली पाहिजे. अर्थ आणि मोक्ष प्राप्ती साठी लक्ष्मी ज्या फुलामध्ये विराजमान झाली आहे ते कमळाचे झाड आहे. याला कमलकट्टा असही म्हणतात.

News18लोकमत
News18लोकमत

2) पारिजातककमळ पुस्पाबरोबरच पारिजातकाच्या झाड देखील महत्वाचे आहे. द्वापारयुगात श्री कृष्णाने इंद्रकडून या झाडाला भूतलावर आणले. पारिजातकपासून रात्री सुगंध दरवळतो. यामुळे हाडाचे विकार देखील नाहीसे होतात. हे झाड घरात असल्यास लक्ष्मीची भरभराट होते. 3) तुळस  तुळशीचे झाडतर आपल्या सगळ्यांचा घरात असते. यामध्ये राम तुळशी, कृष्ण तुळशी अशा विविध प्रकारच्या तुळशी आहेत. तुळशीमुळे आरोग्य चांगले राहते आणि आरोग्य चांगले राहिले की मन आणि लक्ष्मी स्थिर असते.

Vastu Tips : घरात ठेवा ‘ही’ रोपं, शांती येईल आणि संपत्ती सुद्धा होईल वाढ, Video

4) गोकर्णगोकर्ण गोकर्णगोकर्णचे झाड देखील लक्ष्मीला अतिशय प्रिय असे आहे. निळ्या रंगाच्या फुलाचे गोकरणाचे झाड घरात असेल. तर धन संपदा राहून लक्ष्मी प्रसन्न राहते. तसेच लक्ष्मीचे चिरकाल वास्तव घरात राहते. 5) आकुर्डी आकुर्डी बुद्धीची देवता गणपती बुद्धी देत असतो मात्र ती कशी चालवयाची याचे तारतम्य शमिपत्र देत असते. पांढरे फुले येणारी आकुर्डी देखील अतिशय महत्वाची आहे. आकुर्डीची पांढरी फुले आपण गणपती आणि मारोतीला देखील वाहतो. आकुर्डीचा पांढऱ्या फुलांना मंदार असं संबोधल्या जाते. मंदार असेल तर लक्ष्मी कमतरता आपल्याला जाणवत नाही. भरभरून लक्ष्मी आपल्याकडे राहते.

Vastu Tips : मुलांचं जमत नाही लग्न? बेडरुमची बदलावी लागेल दिशा?, वास्तूतज्ज्ञ म्हणतात…

या पाच महत्वाच्या रोपटी बरोबरच मनी प्लांट आणि नारळाचे झाड देखील महालक्ष्मीला अतिशय प्रिय असून आपण या झाडांची लागवड आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात केल्यास आपल्याला धनसंपदा आणि सुख समाधान मिळू शकते, असं पुरोहित विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी सांगितले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात