जाहिरात
मराठी बातम्या / रिअल इस्टेट / Vastu Tips : मुलांचं जमत नाही लग्न? बेडरुमची बदलावी लागेल दिशा?, वास्तूतज्ज्ञ म्हणतात…

Vastu Tips : मुलांचं जमत नाही लग्न? बेडरुमची बदलावी लागेल दिशा?, वास्तूतज्ज्ञ म्हणतात…

Vastu Tips : मुलांचं जमत नाही लग्न? बेडरुमची बदलावी लागेल दिशा?, वास्तूतज्ज्ञ म्हणतात…

मुलांचं लग्न जमत नसेल तर घरातील बेडरुमची दिशा कोणत्या बाजूला हवी? पाहा वास्तूतज्ज्ञांचा सल्ला

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 27 जून :  वास्तु आनंदी असेल, तर आपोआप घर, कुटुंब, व्यक्ती आनंदी राहून जीवन सुख आणि शांतपणे व्यतीत करू शकतात. भारतीय वास्तूकलेत वास्तूशास्त्राला मोठं महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार घर बांधलं तर घरामध्ये आनंद, सुसंवादी वातावरण तयार होते, अशी समजूत आहे. काही वेळा घरातील मुलांचं लग्न जमवण्यासाठी काही अडचणी येतात. त्यावेळी मुलांची बेडरुम कोणत्या दिशेला हवी याबाबत पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी माहिती दिलीय. कुठं असावी बेडरुम? घरातील अन्य खोली किंवा जागांप्रमाणे शयनगृह म्हणजेच बेडरूम हे महत्त्वाचे आणि संवेदनशील मानले जाते. याच ठिकाणी जीवनातील सुख-दुःख वाटली जातात. नवीन स्वप्ने रंगवली जातात. अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते. त्याचबरोबर भविष्यातील योजनांवर उहापोह देखील होतो. त्यामुळे घरातील बेडरुमची दिशा योग्य असावी असं आवर्जुन सांगितलं जातं.

News18लोकमत
News18लोकमत

घरात अविवाहित व्यक्ती असेल आणि त्याचं लग्न जमवण्यासाठी अडचणी येत असतील तर त्याची बेडरूम  योग्य दिशेला असणं महत्वाचं आहे . वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रमुख व्यक्तीची बेडरुम उत्तर दिशेला असू नये, असे सांगितले जाते. तसेच या दिशेला पूर्वजांचा फोटो लावू नये. यामुळे आर्थिक आघाडीवरील चिंता वाढू शकते, असं जोशी यांनी सांगितलं उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. घरातील अन्य सदस्यांसाठी उत्तर दिशेला बेडरुम असणे योग्य मानलं जातं. त्याचप्रमाणे आग्नेय दिशेला कुणाचीही बेडरुम असू नये. त्यामुळे निद्रानाश, मानसिक अशांतता, विचलन, ताण-तणाव वाढू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.अविवाहित मुले आणि पाहुण्यांसाठी असलेले बेडरूम हे वायव्य कोपऱ्यात असावा. घराच्या मध्यभागी बेडरूम असणे योग्य मानले जात नाही आणि या भागाला ब्रम्हाचे स्थान मानले जाते, अशी माहिती जोशी यांनी दिली. Vastu Tips : घराच्या ईशान्य दिशेला चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू अन्यथा होईल नुकसान बेडरुमचा रंग कसा असावा? रंग हे आपल्या मनोविश्वावर प्रभाव टाकतात. बेडरुममध्ये आपण बराच वेळ घालवतो. त्यामुळे तेथील रंगाचं संतुलन आवश्यक आहे. वास्तूशास्त्रानुसार मुलांच्या बेडरुमला पांढरा किंवा हलका रंग हवा. तर मास्टर बेडरुममध्ये हलका रंग दिला पाहिजे. हलका गुलाबी,राखाडी हलका निळा, चॉकलेट हिरवा आणि इतर प्रकाश आणि सकारात्मक छटा असलेले कलर देखील तुम्ही बेडरुमसाठी वापरु शकता,’ अशी माहिती जोशी यांनी दिलीय. (सूचना : येथे दिलेली माहिती तज्ज्ञांचं वैयक्तिक मत आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात