जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / शोभन योगात वैशाख अमावस्या! 5 उपायांनी शनी, अतृप्त पूर्वज दोन्ही होतील प्रसन्न

शोभन योगात वैशाख अमावस्या! 5 उपायांनी शनी, अतृप्त पूर्वज दोन्ही होतील प्रसन्न

वैशाख अमावस्या

वैशाख अमावस्या

अमावस्येला शोभन योग सकाळपासून संध्याकाळी 06.17 पर्यंत राहील. हा योग पूजेसाठी शुभ मानला जातो. या काळात पूजा-विधी करून अमावस्येला तुम्ही शनिदेव आणि तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करू शकता. त्यांच्या कृपेनं…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 मे : वैशाख महिन्यातील दर्श भावुका अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी स्नान आणि दानासह पूर्वजांची आणि शनिदेवाची पूजा केली जाते. वैशाख अमावस्या 19 मे 2023 रोजी शोभन योगात येत आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगतात की, यावर्षी वैशाख अमावस्या 18 मे रोजी रात्री 09:42 ते 19 मे रोजी रात्री 09:22 पर्यंत आहे. अमावस्येला शोभन योग सकाळपासून संध्याकाळी 06.17 पर्यंत राहील. हा योग पूजेसाठी शुभ मानला जातो. या काळात पूजा-विधी करून अमावस्येला तुम्ही शनिदेव आणि तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करू शकता. त्यांच्या कृपेनं तुमचे जीवन सुखी होईल आणि धन, संतती इत्यादीमध्ये वृद्धी होईल. शनिदेवाचा जन्म वैशाख अमावस्येला झाला, म्हणून त्या दिवशी शनि जयंती साजरी केली जाते. वैशाख अमावस्या 2023: शनी आणि पितरांना प्रसन्न करण्याचे उपाय 1. शनिदेवाचा जन्म वैशाख अमावस्या तिथीला झाला होता, म्हणून 19 मे रोजी उपवास करून शनिदेवाची पूजा करावी. त्यांना काळे तीळ, निळे किंवा काळे वस्त्र, काळे उडीद, मोहरी किंवा तिळाचे तेल अर्पण करा. प्रिय वस्तू अर्पण केल्यानं शनिदेवाला खूप आनंद होईल. याशिवाय शनि चालीसा, शनि स्तोत्र, शनि रक्षा कवच इत्यादी पाठ करू शकता. यामुळे तुमचे दु:ख, अडचणी दूर होतील. शनिदेवाच्या कृपेने जीवन आनंदी राहील आणि कामातही यश येईल. साडेसाची आणि शनिदोषांचे दुष्परिणाम संपतील.

News18लोकमत
News18लोकमत

2. वैशाख अमावस्येला म्हणजेच शनि जयंतीच्या दिवशी आपल्या घर-परिसरात शमीचे रोप लावावे. त्याला पाणी देऊन पूजा करावी. संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शमी वनस्पती शनिदेवाला प्रिय आहे. यामुळे शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देतील. शमीच्या रोपाची रोज सेवा करा आणि शनिवारी त्याची पूजा करा. 3. वैशाख अमावस्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरात अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. त्यानंतर पितरांना पाण्याने तर्पण अर्पण करावे. तर्पणच्या वेळी कुशाचा पवित्र धागा धारण करावा. पितृलोकात पाण्याची कमतरता असल्याने तुमचे पूर्वज जल अर्पण करून आनंदित होतील, असे मानले जाते. घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू; अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या 4. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख अमावस्येला आपल्या पूर्वजांच्या प्रिय वस्तू गरीबांना, ब्राह्मणाला दान करा. त्यांना अन्नदान करून दक्षिणा देऊन तृप्त करावे. धार्मिक मान्यतेनुसार पितरांना अशा प्रकारे केलेले दान मिळाल्यानं ते तृप्त होतात. 5. आपल्या पूर्वजांसाठी वैशाख अमावस्येला पिंडदान आणि श्राद्ध देखील केले जातात. याशिवाय तुम्ही तुमच्या पितरांसाठी पंचबली कर्म करू शकता. यासाठी अन्न तयार करून ते गाय, कुत्रा, कावळा, मुंगी यांना खाऊ घाला. अन्नाचा काही भाग पानावर ठेवा आणि पाण्यात वाहू द्या किंवा गायीला द्या. मान्यतेनुसार, असं केल्यानं पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात. अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात