अबूधाबी, 12 सप्टेंबर : संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये (UAE) हिंदू भाविकांसाठी एक मंदिर (Temple In UAE) बांधलं जात आहे. काही दिवसांपूर्वी ते भाविकांसाठी अंशतः खुलं झालं; मात्र त्याचं औपचारिक उद्घाटन व्हायचं आहे. ऑक्टोबर महिन्यात मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या मंदिराची अनेक वैशिष्ट्यं आहेत. पुजाऱ्यांव्यतिरिक्त इतर भाविकही या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकतात. तसंच इतर धर्मीय नागरिकही या मंदिरात जाऊ शकतात. या मंदिराचा काही भाग आता भाविकांना पाहता येईल. दुबईमधल्या जेबेल अली या भागात असलेलं हे मंदिर अतिशय भव्य आहे. या मंदिरात 16 देवी देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी 9 दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शीखांचा पवित्र धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ची स्थापना या मंदिरात ऑगस्टच्या शेवटी करण्यात आली. मंदिराच्या मुख्य सभागृहातच बहुतेकशा देवी-देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अनेक कुटुंबं सहभागी झाली होती. या मंदिरात भाविकांना 1 सप्टेंबरपासूनच प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या वेबसाइटवरच्या क्यूआर कोडचा वापर करून भाविकांना नियोजित वेळा देण्यात आल्या आहेत. मंदिरात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दर्शनासाठी अशी प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. हे वाचा - Angarki Sankshati Chaturthi : शहरानुसार बदलतो चंद्रोदयाचा मुहूर्त, पाहा संकष्ट चतुर्थीला तुमच्या शहरात कधी होईल चंद्रोदय या मंदिराचं औपचारिक उद्घाटन 4 ऑक्टोबरला (Inauguration Will Be On 4th October) करण्यात येणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून (5 ऑक्टोबर) हे मंदिर भाविकांसाठी खुलं होईल. मंदिर प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे. संयुक्त अरब अमिराती व भारतातले अनेक उच्चपदस्थ अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
One more reason to love #Dubai
— 𝑰𝒏𝒅𝒊𝒂𝒏 𝑫𝒊𝒗𝒂 🇮🇳 (@itsDivasChoice) September 6, 2022
Heartfelt gratitude to the Rulers of Dubai for showing tolerance & magnanimity by gifting so beautiful & magnificent Temple to us 🙏
Truly amazing & mesmerizing
Rightly said, UAE is a nation of tolerance, religious freedom & acceptance#DubaiTemple pic.twitter.com/RrHoJpNJ22
सध्या या मंदिरात 14 पुजारी वेद मंत्रघोष करत आहेत. या पुजाऱ्यांना भारतातून बोलावण्यात आलं आहे. मंदिरात सकाळी 7.30 ते 11 आणि दुपारी 3.30 ते 8.30 या काळात हा मंत्रघोष सुरू असतो. त्याव्यतिरिक्त सध्या तिथे इतर कोणताही कार्यक्रम नाही. हे वाचा - अबू धाबीमधल्या पहिल्या हिंदू मंदिराचं काम पाहण्यासाठी पोहोचले जयशंकर, शेअर केले Photo या मंदिरात भाविकांना देवी-देवतांचं दर्शन घेता येईल. लग्न किंवा काही धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी तिथे खास जागा आहे. तसंच होमहवनासाठीही वेगळी जागा राखून ठेवलेली आहे. दसरा, दिवाळी या हिंदूंच्या सणांवेळी या मंदिरात मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.