जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Tree Worship Benefits: या वृक्षांमध्ये देवी-देवता वास करतात, पूजा केल्याने होतो विशेष लाभ

Tree Worship Benefits: या वृक्षांमध्ये देवी-देवता वास करतात, पूजा केल्याने होतो विशेष लाभ

पूजनीय झाडे

पूजनीय झाडे

शास्त्रात ही झाडे पूजनीय मानली जातात कारण त्यांच्यामध्ये देवदेवतांचा वास असतो, असे मानले जाते. या वृक्षांची पूजा केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सुख-समृद्धी नांदते.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 नोव्हेंबर : वृक्ष, वनस्पती, पर्वत आणि नद्या यांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्टीने, काही झाडे आणि वनस्पतींना देवांचे प्रतीक मानले जाते. तुळशी, शमी, केळी अशी अनेक झाडे आहेत जी घरी लावणे खूप शुभ आहे. त्यांची देखभाल करणे म्हणजे देवाची पूजा करण्यासारखे आहे. शास्त्रात ही झाडे पूजनीय मानली जातात कारण त्यांच्यामध्ये देवदेवतांचा वास असतो, असे मानले जाते. या वृक्षांची पूजा केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सुख-समृद्धी नांदते. जाणून घेऊया पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून कोणत्या झाडांची पूजा केल्याने देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पिंपळ हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगितले आहे. पंडितजी सांगतात की, पिंपळात 33 प्रकारच्या देवता राहतात. पिंपळाला अमृताचे झाड असेही म्हणतात. औषधी गुणांनी समृद्ध असलेल्या पिंपळाला कल्पवृक्ष असेही नाव देण्यात आले आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते. सर्व प्रकारचे संकट दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते. वड - पूजनीय वडाच्या झाडाला वटवृक्ष असेही म्हणतात. हिंदू धर्मात पिंपळानंतर वटवृक्षाला खूप महत्त्व आहे. वट सावित्री हा सण हिंदू धर्मात साजरा केला जातो. या दिवशी वडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडामध्ये भगवान शिव वास करतात. वडपूजेने भगवान शंकराची कृपा राहते. अशोक - अशोक वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. अशोक वृक्षातही भगवान शिव वास करतात. अशोकवृक्ष शोक हरतो, असे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यात अशोकाच्या पानांचा वापर केला जातो. घरामध्ये उत्तर दिशेला अशोकाचे झाड लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते, सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते.

News18लोकमत
News18लोकमत

तुळस - हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे देवी लक्ष्मी वास करते, त्यामुळे घरात नेहमी सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तुळशीच्या पानांचे सेवन अनेक रोगांवरही फायदेशीर ठरते. मात्र, रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. केळी - हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी केळी आणि त्याची पाने वापरली जातात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना केळी खूप प्रिय आहेत. प्रसाद म्हणून केळीही वाटली जातात. घरामध्ये समृद्धीसाठी केळीच्या रोपाची पूजा करावी. शमी - शमी वृक्षाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो. शमीचे झाड खूप शुभ आहे. भगवान श्रीरामांनीही शमीची पूजा केली. शमी भगवान गणेश आणि शनिदेवाला खूप प्रिय आहे. वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात