जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / या 5 गोष्टी घरात नकारात्मक शक्ती वाढवतात! वास्तूदोष निर्माण होण्यास ठरतात कारण

या 5 गोष्टी घरात नकारात्मक शक्ती वाढवतात! वास्तूदोष निर्माण होण्यास ठरतात कारण

वास्तुशास्त्र मराठी टिप्स

वास्तुशास्त्र मराठी टिप्स

घरात विशेष करून पाच गोष्टी असतील तर नकारात्मक ऊर्जा वाढून वास्तुदोष निर्माण होतो. घरात नकारात्मकता वाढवणाऱ्या पाच गोष्टी नेमक्या कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 06 मार्च : जीवनात सुख-समृद्धी, यश आणि पैसा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र प्रयत्न करूनही या गोष्टी साध्य होत नसतील तर अशावेळी काही लोक ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घेतात. घरात सुख-समृद्धी कायम राहावी, यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. घरातील वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्या किंवा घराची रचना चुकीची असेल तर वास्तुत नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे सुख-समृद्धी येण्याऐवजी समस्या निर्माण होऊ लागतात. ज्या वास्तुत नकारात्मक ऊर्जा असते, त्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. घरात विशेष करून पाच गोष्टी असतील तर नकारात्मक ऊर्जा वाढून वास्तुदोष निर्माण होतो. घरात नकारात्मकता वाढवणाऱ्या पाच गोष्टी नेमक्या कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊया. जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जांचा प्रभाव व्यक्तीच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी काम करते किंवा राहते, त्या ठिकाणी असलेल्या वस्तूंचा त्याच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो, असं वास्तुशास्त्र सांगते. हा परिणाम नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही स्वरुपात असतो. घरातील वस्तू चुकीच्या दिशेला ठेवलेल्या असतील त्याचा नकारात्मक परिणाम संबंधित व्यक्तीच्या जीवनावर पडतो. यामुळे त्या घरातील लोकांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. याशिवाय काही वस्तूंचा वास्तूवरही परिणाम होतो आणि त्यामुळे वास्तुदोष तयार होतो. सर्वसामान्यपणे घरात काही गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. त्यात अस्वच्छता, जाळे, टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे. घरात बऱ्याचदा कोळ्याचं जाळं लागतं. घरात जाळ्या-जळमटं वाढणं अशुभ मानलं जातं. जाळी हे नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. यामुळे घरात आर्थिक समस्या आणि मानसिक अशांतता वाढते. त्यामुळे घराची सातत्यानं स्वच्छता करणं, जाळ्या-जळमटं काढणं गरजेचं आहे. हे वाचा -  Chanakya: घरावर येऊ शकतं आर्थिक संकट, त्याचे हे 5 संकेत ओळखून वेळीच सुधारा चुका वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, त्या घरातही वास्तुदोष निर्माण होतो. घरातील खोल्यांमध्ये वस्तू अस्ताव्यस्त पडल्या असतील तर त्याचा घरातील व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होतो. अनेक लोकांना घरात रोपं लावण्याची आवड असते. पण काहीवेळा रोपांची नीट देखभाल न झाल्याने रोपं सुकून जातात. सुकलेल्या रोपांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरातील एखादं रोपं सुकलं असेल तर ते तातडीने काढून टाकावं. ज्या घरात सुकलेली रोपं असतात, त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद, कलह होतात. याशिवाय घरात काटे असलेली रोपे लावणं वर्ज्य मानलं जातं. हे वाचा -  भाग्यात यश आणि कीर्तीचे योग जुळतील, रविवारी सूर्यदेवासाठी हे उपाय करून पहा वास्तुशास्त्रानुसार, घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अस्वच्छता होय. ज्या घरात अस्वच्छता असते अशा ठिकाणी दारिद्रय आणि आजारपण कायम असते. वैदिक ज्योतिष शास्त्रात शुक्र हा भौतिक सुख-समृद्धीचा कारक मानला आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र प्रबळ असतो, त्यांना सर्व प्रकारचे सुख-समृद्धी लाभते. शुक्राला स्वच्छता प्रिय असते. याशिवाय स्वच्छ ठिकाणी लक्ष्मी माता वास्तव्य करते. लक्ष्मी माता सुख-समृद्धी प्रदान करणारी देवता मानली जाते. स्वच्छता असलेल्या घरात लक्ष्मी माता वास्तव्य करते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काही लोकांना घरात खराब आणि वापरात नसलेल्या वस्तू साठवून ठेवण्याची सवय असते. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात तुटलेल्या, फुटलेल्या आणि वापरात नसलेल्या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे अशा वस्तू घरातून बाहेर फेकणं किंवा अशा वस्तू तातडीने दुरुस्त करणं गरजेचं आहे. घरात तुटलेली भांडी,तुटलेली कडी, दरवाजे आणि खिडक्यांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुटलेल्या वस्तू काढून टाकणं किंवा त्या दुरुस्त करणं गरजेचं आहे. हे वाचा -  सोमवारी हुताशनी पौर्णिमा, होळी दहनासाठी शुभ मुहूर्त, धूलीवंदनची माहिती जाणून घ्या

    (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Religion , vastu
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात