जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / ICICI बँकेची नोकरी सोडली कृष्ण भक्तीसाठी; एकुलता एक मुलगा बनला महंत

ICICI बँकेची नोकरी सोडली कृष्ण भक्तीसाठी; एकुलता एक मुलगा बनला महंत

आयुष्य अगदी सुरळीत सुरू असताना त्यांनी स्वतःला कृष्ण भक्तीत रमवून घेतलं.

आयुष्य अगदी सुरळीत सुरू असताना त्यांनी स्वतःला कृष्ण भक्तीत रमवून घेतलं.

लग्नानंतर वर्षभरातच त्यांनी पत्नीची परवानगी घेऊन संसाराचा त्याग करायचं ठरवलं. कुटुंबियांच्या परवानगीने ते कृष्ण भक्तीत तल्लीन झाले.

  • -MIN READ Local18 Lucknow,Uttar Pradesh
  • Last Updated :

अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 22 जुलै : कधी कधी आयुष्यात काही अशा अनपेक्षित घटना घडतात की ज्यामुळे आपलं पूर्ण जगणंच बदलतं. असंच काहीसं घडलं उत्तर प्रदेशच्या इटावा भागातील रहिवासी अनुराग दीक्षित यांच्याबाबत. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने ते अत्यंत लाडात लहानाचे मोठे झाले. कानपूर विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवून ते दिल्लीच्या आयसीआयसीआय बँकेत मॅनेजरपदी नियुक्त झाले. मात्र आयुष्य अगदी सुरळीत सुरू असताना त्यांनी स्वतःला कृष्ण भक्तीत रमवून घेतलं. 2007 साली अनुराग लग्नबंधनात अडकले. सर्वकाही छान सुरू होतं. मात्र त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोस्वामी यांनी त्यांना मानव जीवनाबाबत काही धडे दिले. ते म्हणाले, ‘काही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात, तर काही नाती आपण आयुष्याच्या विविध टप्प्यांवर जोडत असतो. धनसंपत्ती कमवण्यासाठी आपण दररोज मेहनत करतो. मात्र मृत्यू होताच आपण हे सर्वकाही एका क्षणात गमावतो. आपल्यासोबत जातं ते केवळ आपलं चांगलं कर्म. त्यामुळे शक्य तितकं चांगलं कर्म करत राहावं.’ गुरूंचं हे म्हणणं अनुराग यांना पटलं आणि त्यांनी एक असा निर्णय घेतला की, ज्यामुळे त्यांचंच नाही, तर त्यांच्या पत्नीचंदेखील आयुष्य बदललं.

News18लोकमत
News18लोकमत

लग्नानंतर वर्षभरातच म्हणजे 2008 साली त्यांनी पत्नीची परवानगी घेऊन संसाराचा त्याग करायचं ठरवलं. कुटुंबियांच्या परवानगीने ते कृष्ण भक्तीत तल्लीन झाले. त्यांना त्यांच्या गुरूंनी नवं नावही दिलं. अनुराग दीक्षित हे आता अपरिमेय श्याम दास या नावाने ओळखले जाऊ लागले. सध्या ते लखनऊच्या इस्कॉन मंदिरात अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भाविक त्यांना इस्कॉन मंदिराचे महंत म्हणतात. Crime News: छ. संभाजीनगर हादरलं! सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, गरोदर राहिल्याने प्रकरण उघड अपरिमेय श्याम दास म्हणाले, जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आई-वडिलांना त्रास झालाच होताच, मात्र आजूबाजूच्या लोकांना जरा जास्तच त्रास झाला. त्यांनी थेट मला वेड लागल्याचं जाहीर करून टाकलं होतं. ‘आताच लग्न झालंय, एवढी चांगली नोकरी आहे, सगळं काही सोडून जातोय’, असं ते म्हणू लागले होते. हे ऐकून माझ्या आई-वडिलांना आणखी त्रास व्हायचा.’ महत्त्वाचं म्हणजे आता त्यांचे आई-वडील आणि पत्नी त्यांच्यासोबतच आहेत. त्यांना तीन मुलीदेखील आहेत. कुटुंबाचा सांभाळ करून अपरिमेय श्याम दास कृष्ण भक्ती करतात आणि लोकांना धार्मिक ग्रंथांचे महत्त्व सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात