जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Solapur News: सिद्धेश्वर तलावात आढळले चतुर्मुखी लिंग, या देशातील शिवलिंगाशी आहे साधर्म्य, Video

Solapur News: सिद्धेश्वर तलावात आढळले चतुर्मुखी लिंग, या देशातील शिवलिंगाशी आहे साधर्म्य, Video

Solapur News: सिद्धेश्वर तलावात आढळले चतुर्मुखी लिंग, या देशातील शिवलिंगाशी आहे साधर्म्य, Video

Solapur News: सिद्धेश्वर तलावात आढळले चतुर्मुखी लिंग, या देशातील शिवलिंगाशी आहे साधर्म्य, Video

सोलापूर हे शहर सिद्धेश्वर नगरी म्हणून ओळखले जाते. सिद्धेश्वर तलावात स्वच्छता करताना पुरातन चतुर्मुखी शिवलिंग सापडले आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 18 जून: सोलापूर हे शहर सिद्धेश्वरांची नगरी म्हणून ओळखले जाते. ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धेश्वरांवर सोलापूरकरांची अपार श्रद्धा असून सिद्धेश्वर तलावाच्या मध्यभागी हे मंदिर आहे. सोलापुरातील काही तरुणांनी एकत्र येत सिद्धेश्वर तलावाच्या स्वच्छतेचा विडा उचलला आहे. आठवड्यातून एक दिवस एकत्र येत ते तलावाची स्वच्छता करतात. ही स्वच्छता करत असतानाच त्यांना एक पुरातन शिवलिंग सापडले आहे. विशेष म्हणजे हे शिवलिंग चतुर्भुज असून नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरातील लिंगाशी साधर्म्य असणारे आहे. शिवलिंग वस्तू संग्रहालयास देणार सिद्धेश्वर तलावात स्वच्छता करताना काही युवकांना शिवलिंग आढळले. हे शिवलिंग इतिहास संशोधक नितीन अणवेकर यांच्याशी चर्चा करून दयानंद महाविद्यालय येथील वस्तू संग्रहालयास हे भेट देण्याचा मानस आहे. यामुळे अभ्यासकांना शिवलिंगाविषयी अभ्यास करता येईल व जिज्ञासूंना ते पाहता येईल, असे धाराशिवकर यांनी सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

अशी आहे शिवलिंगाची रचना या शिवलिंगाची रचना चतुर्मुखी आहे. अशा प्रकारचे शिवलिंग हिमाचल प्रदेश व नेपाळ या प्रदेशात प्रामुख्याने आढळतात. यात काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिरातील शिवलिंग चार मुख असलेले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता हे चतुर्मुखी लिंग चार दिशांची व देवाच्या चार पैलूंचे प्रतिनिधित्व करते. निर्मिती, क्रोध, सौम्यता व तपस्वी असे चार रुपे असून जवळपास अनेक वर्षांपासून शिवलिंग पाण्यात पडून होते. शिवाय एका ठिकाणी या शिवलिंगाचे थोडेसे खवले निघाले असल्याचे दिसते, असे धाराशिवकर यांनी सांगितले. पुरातन वस्तू संग्रहालयात जमा करा यापुढे जर असे कोणतेही शिवलिंग किंवा एखादी दुर्मिळ मूर्ती कुणाला आढळली तर ती सोलापुरातील इतिहासकारांकडे द्यावी. भाविकांना किंवा पर्यटकांना अशी वस्तू आढळल्यास ती योग्य ठिकाणी द्यावी. आपल्या अध्यात्माचा ठेवा इतका मोठा आहे की तो आपण जतन केला पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढीस आपला इतिहास लक्षात राहील, असे आवाहन धाराशिवकर यांनी केले आहे. वारीत महिला डोक्यावर तुळस घेऊन का जातात? पाहा काय आहे महत्त्व Video सोलापुरातील युवकांचा अनोखा संकल्प मागील काही दिवसांपासून सोलापुरातील युवकांनी श्री सिद्धेश्वर तलाव स्वच्छतेचा विडा उचलला आहे. सिद्धेश्वर तलावाच्या काठाने असलेली घाण, निर्माल्य, पाण्याच्या बाटल्या, नारळ व इतर वस्तू दर आठवड्यातून एकदा येऊन स्वच्छता केली जाते. या मोहिमेत महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण व त्यांच्या इतर सहकारी श्रमदान करतात. तसेच भाविकांनी कोणत्याही प्रकारचे निर्माल्य किंवा कचरा सिद्धेश्वर तलावात टाकू नये, असे आवाहन ते करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात