शिवानी धुमाळ, प्रतिनिधी पुणे, 17 जून : आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरकडे निघाले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकारामचे जयघोष सध्या आसमंत भारून टाकताना पाहायला मिळत आहेत. लाखो वारकरी दूरवरचा प्रवास करून आपल्या आराध्याचं म्हणजेच पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला झपझप चालताना मुखाने ‘माउली माउली, तू संतांची सावली, दारी तुळस लावावी,’असं म्हणताना दिसतात. पण वारीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन का जातात? हिंदू धर्मामध्ये तुळशीला नेमकं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय आहे तुळशीचं महत्त्व? वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला आपल्या नजरेसं पडतात. त्यामुळे ही तुळस डोक्यावर घेऊन या महिला का चालत असतील असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तुळस भगवंतापेक्षाही मोठी आहे असं मानलं जातं. शास्त्रात तुळशीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.
तुळस विष्णूंना प्रिय आहे असं सांगितलं गेलं आहे. विष्णूच्या प्रत्येक पूजेत तुळस वाहावी लागते. दुसरीकडे पंढरीचा विठुराय म्हणजे विष्णूंचं एक रूप मानलं गेलं आहे. सहाजिकच तुळस जशी विष्णूंना प्रिय तशीच ती पंढरीच्या विठ्ठलालाही अत्यंत प्रिय आहे असं मानलं गेलं आहे. तुळस ही निर्जंतुका आहे त्यामुळे तुळस ही प्रवासात डोक्यावर घेतलेली चांगली असते, असं वारीतील महिला सांगतात. तुळशीचे वैज्ञानीक महत्त्व जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 आणि रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान कृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड आणि फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यु सोडते.
Beed News : संत मुक्ताबाईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन, 300 वर्षांपेक्षा अधिक जुना इतिहास, Video
व या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न आणि आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे आणि किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत.तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुल हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते असे सांगितले जाते. एकंदरीतच तुळस ही भगवंताला प्रिय असून तिचे अनेक फायदे असल्याचं देखील वारकरी सांगतात.