जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / राम मंदिरापूर्वी भव्य सभागृहाचे होणार उद्घाटन, भाविकांना हायटेक सुविधा

राम मंदिरापूर्वी भव्य सभागृहाचे होणार उद्घाटन, भाविकांना हायटेक सुविधा

राम मंदिरापूर्वी भव्य सभागृहाचे होणार उद्घाटन, भाविकांना हायटेक सुविधा

मंदिराचे बांधकाम 23 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे तर पुढच्या वर्षी 24 जानेवारी 2024 ला भगवान राम भव्य मंदिरात विराजमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • -MIN READ Local18 Uttar Pradesh
  • Last Updated :

सर्वेश श्रीवास्तव (अयोध्या), 18 मे : अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर युद्ध पातळीवर बांधले जात आहे. मंदिराचे बांधकाम 23 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे तर पुढच्या वर्षी 24 जानेवारी 2024 ला भगवान राम भव्य मंदिरात विराजमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, प्रभू रामाच्या विराजमानापूर्वी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट सध्या आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या तयारीत आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने एक सभागृह बांधले असून त्याचे उद्घाटन 22 मे रोजी होणार आहे.

जाहिरात

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्यावतीने ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आणि सदस्यांना राहण्यासाठी तसेच पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी श्री राम अतिथीगृह हे सभागृह बांधले आहे. सभागृहाचे जवळपास 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टसाठी एक निरीक्षण ग्रह तयार करण्यात आले आहे. तसेच हा सभागृह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

News18लोकमत
News18लोकमत

जिथे राम भक्तांसाठी राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाणार आहे. एवढेच नाही तर एका बाजूला भव्य मंदिर उभारले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला श्री रामजन्मभूमीचे सभामंडप तयार झाले. 22 मे रोजी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर या सभागृहात राम मंदिर निर्माण समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कॅम्प ऑफिसचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, श्री रामजन्मभूमीजवळ आमचे अतिथीगृह तयार होत आहे. ज्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील, लोकांच्या राहण्याची व्यवस्था सुरळीत होईल. याशिवाय उपाहारगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

प्रकाश गुप्ता म्हणाले की, सभागृहात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या शिबिर कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, श्री राम अतिथी भवनाची तयारी 22 मे पर्यंत पूर्ण झाल्यास त्याचे उद्घाटन 22 मे रोजी होऊ शकते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात