मुंबई, 23 जुलै : हिंदू धर्मात सकाळी सूर्याची पूजा करण्याची परंपरा चालत आली आहे. सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देणारे अनेक लोक आहेत. अनेकवेळा पावसाळ्यात ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन होत नाही. त्यामुळे काही लोकांचा गोंधळ उडतो. ढगाळ स्थितीत सूर्याला अर्घ्य कसे अर्पण करावे आणि त्याचे फळ मिळेल की नाही. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये पंचदेवांचे वर्णन केले आहे, त्यापैकी भगवान गणेश, भगवान शिव, पालनहार विष्णू, देवी दुर्गा आणि सूर्यदेव. कलियुगात सूर्यदेव हे एकमेव दृश्य देवता आहेत, असे मानले जाते. जो व्यक्ती सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पूजा करतो, त्याच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदते आणि अशा व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळतो, असे मानले जाते. पावसाळ्यात माणसाने सूर्याची पूजा, अर्घ्य कसे द्यावे, याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत. सूर्याची अशी पूजा करा - हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याचे भांडे वापरावे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना ऊँ सूर्याय नम:, ऊँ आदित्याय नम:, ऊँ भास्कराय नम: इत्यादी मंत्रांचा जप करत राहा. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती चांगली नसेल तर त्याने रोज सूर्याला जल अर्पण करावे. असे केल्याने कुंडलीत असलेले सूर्य दोष दूर होतात.
पावसाळ्यात असे अर्घ्य अर्पण करावे - पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा ढगांमुळे सूर्यदेवाचे दर्शन होत नाही, अशा स्थितीत पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाचे ध्यान करावे आणि तांब्याच्या पात्राने सूर्यमंत्राने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. याशिवाय रोज सकाळी सूर्यदेवाची मूर्ती किंवा चित्राचे दर्शन घेऊ शकता. रॉयल लाइफ जगण्याचे शौकीन असतात या राशीची माणसं; स्वप्न सत्यातही उतरवतात सूर्यनारायण नऊ ग्रहांचा राजा - हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला गेला आहे. सूर्य देव सिंह राशीचा शासक ग्रह आहे. शनिदेव, यमराज आणि यमुना ही सूर्यदेवाची मुले असल्याचे मानले जाते. सूर्यदेव हे हनुमानाचे गुरू आहेत. हनुमानाला सूर्यदेवाकडूनच ज्ञान मिळाल्याचीही धार्मिक श्रद्धा आहे. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)